IND vs NZ 1st ODI Live : वेगे वेगे धावू...! Umran Malik ने टाकला सामन्यातील वेगवान चेंडू; किवी फलंदाज गार, Video

India vs New Zealand 1st ODI Live : शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे लक्ष्य उभे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:20 PM2022-11-25T13:20:42+5:302022-11-25T13:21:35+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ 1st ODI Live :  153 kph by Umran Malik - fastest ball of the match, At the end of 25 overs, New Zealand have scored 115/3, Video | IND vs NZ 1st ODI Live : वेगे वेगे धावू...! Umran Malik ने टाकला सामन्यातील वेगवान चेंडू; किवी फलंदाज गार, Video

IND vs NZ 1st ODI Live : वेगे वेगे धावू...! Umran Malik ने टाकला सामन्यातील वेगवान चेंडू; किवी फलंदाज गार, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand 1st ODI Live : शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे लक्ष्य उभे केले. संजू सॅमसन व वॉशिंग्टन सुंदर यांनी फटकेबाजी करताना उपयुक्त धावा जोडल्या. आजच्या सामन्यात उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांनी पदार्पण केले आणि त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. जम्मू-काश्मीरच एक्स्प्रेस उम्रानने ( Umran Malik) आज किवी फलंदाजांना आपल्या वेगाने भांबावून सोडले. आजच्या सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू उम्रानने फेकला.

IND vs NZ ODI: मिशन २०२३ वर्ल्ड कप! २१ सामने अन् १५ जागांसाठी ३१ खेळाडू शर्यतीत; टॉप ऑर्डर ते गोलंदाजी सगळीकडे चुरस


शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ९ चेंडूंच्या फरकाने दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६)  यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने ( Washington Sundar ) सर्वांची वाहवाह मिळवली. त्याने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या. 

प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सावध खेळ केला. फिन अॅलन व डव्हॉन कॉनवे ही जोडी विकेट टिकवून खेळत होती. त्यात युजवेंद्र चहलने फिनला जीवदान दिले, परंतु शार्दूल ठाकूरने त्याच षटकात फिनला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानतर उम्रान मलिकने कमाल केली. वेगवान मारा करताना त्याने किवी फलंदाजांची बोलती बंद केलीच, शिवाय दोन धक्के देत दडपणही निर्माण केले. उम्रानने किवींचा सलामीवीर कॉनवे ( २४) आणि डॅरील मिचेल ( ११) यांची विकेट घेतली. त्याने आजच्या सामन्यात १५३kmph वेगवान चेंडू टाकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ 1st ODI Live :  153 kph by Umran Malik - fastest ball of the match, At the end of 25 overs, New Zealand have scored 115/3, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.