Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?

IND vs NZ 1st ODI Live Streaming : कधी अन् कुठं रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:44 IST

Open in App

IND vs NZ 1st ODI Live Streaming : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसह यंदाच्या नव्या वर्षाची सुरुवात करत आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार असल्यामुळे या मालिकेची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. इथं एक नजर टाकुयात भारत-न्यूझीलंड या दोन्ही संघात कसा आहे वनडेतील रेकॉर्ड? कुठं अन् कसा पाहता येईल रोहित-विराटसह टीम इंडियाचा वनडे शो यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कधी अन् कुठं रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना? 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना वडोदरा येथील बीसीएच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, १ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी या सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल. 

श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)

IND vs NZ ODI सामना कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय जिओ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातूनही क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा लाईव्ह स्ट्रीमिंगसह या सामन्याचा आनंद घेता येईल.

कसा आहे भारत-न्यूझीलंड यांच्यातील वनडेतील रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यत १२० वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ६२ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असून ५० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली आहे. ७ सामने हे अनिर्णित राहिले असून एक सामना बरोबरीत सुटल्याचेही पाहायला मिळाले आहे. घरच्या मैदानात भारतीय संघाने १४ सामने जिंकले असून भारतीय मैदानात न्यूझीलंडच्या संघाला फक्त ८ सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तटस्थ ठिकाणीही भारतीय संघाने १७ तर न्यूझीलंडच्या संघाने १६ सामने जिंकले आहेत. आकडेवारीमध्ये टीम इंडियाचा बोलबाला दिसतो. पण न्यूझीलंडचा संघाने भारतीय संघाला तगडी फाईट दिली आहे, तेही दिसून येते. त्यामुळेच ही द्विपक्षीय मालिका रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India vs. New Zealand ODI: Rohit and Virat Return to Field!

Web Summary : India begins its ODI series against New Zealand. Rohit Sharma and Virat Kohli return, creating excitement. The first match will be held in Vadodara. The series will be broadcast on Star Sports and Jio Hotstar. India leads in ODI head-to-head records, but New Zealand provides tough competition.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहलीशुभमन गिल