India vs New Zealand, 1st ODI Harshit Rana Sends Openers Back To Pavilion : वडोदराच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सहा गोलंदाजांसह मैदानात उतरलेला भारतीय संघाला पहिली विकेट घेण्यासाठी २२ व्या षटकापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स जोडीनं अगदी संयमी खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून देत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. खरंतर सहाव्या षटकात हर्षित राणानं हेन्री निकोलला फसवलं होते. पण कुलदीप यादवनं त्याचा झेल सोडला अन् या संधीच सोनं करताना त्याने डेवॉन कॉन्वेच्या साथीनं शतकी भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षित राणानेच दोन्ही सलामीवीरांना धाडले तंबूत
न्यूझीलंडची सेट झालेली जोडी कोण फोडणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना हर्षित राणाने २२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. स्लोव्हर बॉलवर त्याने हेन्री निकोल्स याला लोकेश राहुल करवी झेलबाद केले. ६९ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ६२ धावा करणाऱ्या हेन्रीनं पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी रचली. २३ व्या षटकात हर्षित राणा पुन्हा गोलंदाजीसाठी आला या षटकात त्याने डेवॉन कॉन्वेला आधी धीम्या गतीने मारा केला. या षटकातील अखेरचा चेंडू फेकताना वेग पकडला अन् गतीमध्ये कमालीची मिश्रण करुन दाखवत त्याने डेवॉन कॉन्वेला तंबूचा रस्ता दाखवला. कॉन्वेनं ६७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली.
ODI Record : मैदानात उतरताच 'विराट' विक्रम! 'दादा' मागे पडला; इथं मास्टर ब्लास्टर सचिन जगात भारी!
एक चूक नडली! शतकी भागीदारीसह मोजावी लागली किंमत
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या वर्षात व्हाइट बॉल क्रिकेटमधील आपला दबदबा कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकत टीम इंडियाची सुरुवातही चांगली झाली. पण न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी आक्रमक पवित्रा न आजमावता भारतीय गोलंदाजांसमोर संयमाने खेळी करत टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. कुलदीप यादवनं झेल सोडलेल्या झेलची किंमत टीम इंडियाला सलामीवीरांच्या शतकी भागीदारीच्या रुपात मोजावी लागली. पण ही दोघे माघारी फिरल्यावर भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केले. मोहम्मद सिराजनं न्यूझीलंडला तिसरा तर कुलदीप यादवनं पाहुण्या संघाला चौथा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.