Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी

वडोदरा स्टेडियमवर रोहित-विराटची क्रेझ, दोन सुंदरीं खास फलकबाजीमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:44 IST

Open in App

IND vs NZ 1st ODI Cute Fangirls With Poster For Rohit Sharma And Virat Kohli At BCA Stadium : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथील बीसीएच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्यांदाच या मैदानात आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज मैदानात उतरल्यामुळे स्टेडियममध्ये अपेक्षेनुसार 'रो-को' माहोल पाहायला मिळाला. या दोन दिग्गजांना खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्यने स्टेडियमवर हजेरी लावली आहे. यात दोन तरुणींनी खास फलकबाजीसह लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 वडोदरा स्टेडियमवर रोहित-विराटची क्रेझ, दोन सुंदरीं खास फलकबाजीमुळे चर्चेत

सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर पोहचलेल्या चाहत्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यात दोन सुंदरींनी हटके फलकबाजीसह रोहित आणि विराट आपल्या गळ्यातील ताईत असल्याचे दाखवून दिले. जो फोटो व्हायरल होत आहे त्यात, दोन तरुणी दिसत आहेत. यातील एका तरुणीने आपल्या हातात धरललेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, मी डॉक्टर आहे आणि रोहित शर्मा हा माझ्यासाठी मेडिसन आहे. तिच्या मैत्रीणीच्या फलकबाजीत विराट प्रेमाची अक्षरे अवतरली आहेत. या तरुणीने विराट कोहलीची मुलगी वामिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पहिल्या वनडेत विराट कोहली शतक झळकावून लेकीचा बर्थडे साजरा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ODI Record : मैदानात उतरताच 'विराट' विक्रम! 'दादा' मागे पडला; इथं मास्टर ब्लास्टर सचिन जगात भारी!

रोहित-विराट मैदानात उतरणार, मग माहोल तर दिसणारच ना!

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी-२० क्रिकेट पाठोपाठ कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोघेही फक्त वनडेत सक्रीय आहेत. त्यामुळे वनडेत या जोडीसाठी मोठा चाहतावर्ग स्टेडियमवर गर्दी करताना पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसले होते. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रोहित मुंबईच्या संघाकडून तर किंग कोहली दिल्लीच्या संघाकडून मैदानात उतरला होता. या दोघांमुळे देशांतर्गत क्रिकेट सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले होते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये तो माहोल दिसणार नाही असे कसे होईल.   

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor fan's unique poster for Rohit; friend requests Kohli for Vamika.

Web Summary : During the India vs. New Zealand ODI, two fans grabbed attention with creative posters. One declared Rohit Sharma her medicine, while the other wished Virat Kohli’s daughter Vamika a happy birthday and hoped Kohli would celebrate with a century.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीरोहित शर्मा