भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी; जसप्रीत बुमराहसह गोलंदाजांची लैय भारी कामगिरी

IND vs IRE 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 10:53 PM2023-08-20T22:53:18+5:302023-08-20T22:55:20+5:30

whatsapp join usJoin us
 IND vs IRE 2nd T20I Live Marathi : INDIA WON THE T20I SERIES BY 2-0 AGAINST IRELAND.  | भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी; जसप्रीत बुमराहसह गोलंदाजांची लैय भारी कामगिरी

भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी; जसप्रीत बुमराहसह गोलंदाजांची लैय भारी कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs IRE 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अन् संजू सॅमसन, रिंकू सिंग व शिवम दुबे यांच्या फटकेबाजीने भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह ( २-१५) प्रसिद्ध कृष्णा ( २-२९) व रवी बिश्नोई ( २-३७) यांनी कमालीची गोलंदाजी केली. पण, अँडी बालबर्नीने ७२ धावांची खेळी करून भारतीयांची झोप उडवली होती. जसप्रीतने २०वे षटक निर्धाव टाकले. 

सिंग इज किंग! रिंकून सिंगने ५ चेंडूंत माहौल बनवले, आयर्लंडच्या गोलंदाजांना रडवले, Video

आयर्लंडची सुरुवात खराब झाली. प्रसिद्ध कृष्णाने तिसऱ्या षटकात आयर्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. पॉल स्टर्लिंग ( ०) व लॉर्कन टकर ( ०) हे माघारी परतल्याने आयर्लंडची अवस्था २ बाद १९ अशी केली. रवी बिश्नोईने त्याच्या गुगलीची पुन्हा जादू दाखवली आणि हॅरी टेक्टरची ( ७) दांडी उडवली. कर्टीस कॅम्फर आणि अँडी बालबर्नी यांनी आयर्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु बिश्नोईने पुन्हा एकदा कमाल केली. कॅम्फर ( १८) शिवम दुबेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ( प्रसिद्ध कृष्णाच्या २ विकेट्स ) बालबर्नीने एक बाजू लावून धरताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. बालबर्नीचा सोपा झेल ऋतुराजने टाकला आणि त्यानेच भारतीय गोलंदाजांना चोपले.

बालबर्नीला साथ देणारा जॉर्ज डॉक्रेल ( १३) घाई केल्यामुळे आऊट झाला. बालबर्नी चांगली फटकेबाजी करत होता, परंतु अर्शदीप सिंगने त्याला चकवले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाड करणे बालबर्नीला महागात पडले अन् ते ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ७१ धावांवर झेलबाद झाला. या विकेटनंतर जसप्रीत बुमराहने आयर्लंडला आणखी एक धक्का देऊन बॅकफूटवर फेकले. अर्शदीपने या विकेटसह ट्वेंटी-२०त विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ सामन्यांत हा टप्पा गाठला अन् जसप्रीत बुमराहचा ( ४१) विक्रम मोडला. १९व्या षटकात प्रसिद्धचे सलग दोन चेंडू मार्क एडरने सीमापार पाठवले. आयर्लंडला ६ चेंडूंत ३८ धावा करायच्या होत्या. एडर १५ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला अन् भारताने ३३ धावांनी सामना जिंकला. आयर्लंडला ८ बाद १५२ धावा करता आल्या.

तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल (१८) आणि तिलक वर्मा ( १) माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांनी दमदार फटकेबाजी केली. संजूने ४० धावा ( २६ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) केल्या आणि त्याने ऋतुराजसह ४९ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५८ धावांवर झेलबाद झाला. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी २८ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी करून भारताला मोठा पल्ला गाठून दिला. रिंकूने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा चोपल्या, तर शिवम २२ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ५ बाद १८५ धावा केल्या.

Web Title:  IND vs IRE 2nd T20I Live Marathi : INDIA WON THE T20I SERIES BY 2-0 AGAINST IRELAND. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.