IND vs ENG 4th Test Day 4 Yashasvi Jaiswal Sai Sudharsan Out On Duck : इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात एकदम खराब झाली. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ६६९ धावा करत ३११ धावांची मोठी आघाडी घेतल्यावर सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या रुपात टीम इंडियाने क्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात २ चेंडूवर शून्यावर १ विकेट्स गमावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी चार चेंडू खेळून अपयशी; साई 'दर्शन' देऊन गोल्डन डकचा शिकार
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात चार चेंडूचा सामना करून क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर जो रुटकडे झेल देऊन शून्यावर माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या साई सुदर्शन याला तर वोक्सनं खातेही उघडू दिले नाही.
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
यशस्वीवर ओढावली ही नामुष्की, जडेजा-रहाणेसह इशांतचा नकोसा विक्रम मोडला
इंग्लंडविरुद्ध शून्यावर बाद होताच यशस्वी जैस्वालच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत तो पाचव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. याआधी इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा WTC मध्ये प्रत्येकी ४ वेळा शून्यावर बाद झाल्याचा रेकॉर्ड होता. या तिघांना मागे टाकत आता यशस्वी सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर पोहचला आहे. WTC मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर होण्याचा रेकॉर्ड हा जसप्रीत बुमराहच्या नावे आहे. तब्बल २३ वेळा तो खाते उघडण्यात अपयशी ठरलाय.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक वेळा भोपळा पदरी पडलेले भारतीय
- २३ – जसप्रीत बुमराह
- १२ – मोहम्मद सिराज, विराट कोहली, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन
- ६ – चेतेश्वर पुजारा
- ५ – शुबमन गिल
- ५ – उमेश यादव
- ५ – यशस्वी जैस्वाल
- ४ – इशांत शर्मा
- ४ – अजिंक्य रहाणे
- ४ – रवींद्र जडेजा
Web Title: IND vs ENG Yashasvi Jaiswal Sai Sudharsan Out On Duck vs England In 4th Test At Old Trafford Manchester
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.