Why Ishan Kishan Replaces Rishabh Pant : इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत कमबॅक करण्याचे मोठे आव्हान समोर असताना टीम इंडियाला रिषभ पंतच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा विकेट किपर बॅटर मँचेस्टरच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात दुखापग्रस्त झालाय. उजव्या पायच्या करंगळी जवळ फॅक्चर असल्याचे स्कॅनमध्ये दिसून आले असून त्याला ६ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे समोर येत आहे. पंत आउट झाल्यावर इशान किशनसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकतात. इथं जाणून घेऊयात बॅकअप विकेट किपरच्या रुपात ध्रुव जुरेल संघात असताना टीम इंडियात इशान किशनला कोणत्या कारणामुळे मिळू शकते संधी त्याबद्दलची सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..तर २ वर्षांनी तो टीम इंडियाच्या ताफ्यात दिसेल
इंडियन एक्स्प्रेसनं BCCI च्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, रिषभ पंतच्या जागी पाचव्या कसोटी सामन्याआधी इशान किशनला संघात सामील करून घेतले जाऊ शकते. जर असं झालं तर २ वर्षांनी तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ताफ्यातून खेळताना दिसेल. इशान किशन याने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता.
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
या कारणामुळे रिषभ पंतच्या जागी परफेक्ट पर्याय ठरतोय इशान किशन
इशान किशन बदली खेळाडूच्या रुपात प्रबळ दावेदार ठरण्यामागचं प्रमुख कारण तोही रिषभ पंतप्रमाणे विकेट किपर बॅटर आहे. तो आक्रमक शैलीत फटकेबाजी करण्यात माहिर आहे. सध्याच्या घडीला रिषभ पंत ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो तिथं तो एकदम परफेक्ट बसतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला तो इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये नॉरदॅम्प्टनशायर (Northamptonshire) संघाकडून ८७ आणि ७७ धावांच्या खेळीसह लक्षवेधून घेतले होते.
सुट्टी मागितल्यावर BCCI नं दाखवला होता बाहेरचा रस्ता
इशान किशन हा अल्पावधित खास छाप सोडणाऱ्या स्टार क्रिकेटर्सपैकी एक आहे. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने अचानक ब्रेक मागितला. एवढेच नाही तर देशांतर्गत क्रिकेटपासूनही तो दूर राहिला. परिणामी टीम इंडियात पुनरागमन करणं त्याच्यासाठी अधिक आव्हानात्मक झालं. आपल्या चुका सुधारून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसला. आता इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्येही तो आपल्या भात्यातील धमक दाखवून देत आहे. रिषभ पंतच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसल्यामुळे त्याला टीम इंडियात एन्ट्रीची संधी निर्माण झाली आहे.