Join us

Virat Kohli, IND vs ENG : "हे गप्प राहायला कधी शिकणार?", जॉनी बेअरस्टोला डिवचणाऱ्या विराट कोहलीबाबत जेम्स अँडरसनचं मोठं विधान

जॉनी बेअरस्टोने दोन्ही डावांत शतकी खेळी करून एडबस्टन कसोटीत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:47 IST

Open in App

जॉनी बेअरस्टोने दोन्ही डावांत शतकी खेळी करून एडबस्टन कसोटीत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मालिका विजयाचे स्वप्न घेऊन आलेल्या भारतीय संघावर यजमानांनी ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो ( Virat Kohli vs Jonny Bairstow) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. सोशल मीडियावर त्यांच्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

तोंड बंद ठेव! विराट कोहली भडकला, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसोबत राडा, Video 

पाचव्या कसोटीत बेअरस्टोने भारतीय गोलंदाजांची झोप उडवली होती आणि पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला पराभव पत्करण्यास भाग पाडले होते. बेअरस्टो व माजी कर्णधार जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद २६९ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो १४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या पहिल्या डावात विराटने बेअरस्टोला डिवचले. या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली सर्वांनी पाहिले. यानंतर बेअरस्टोने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्यावरून एक ट्विट केले... त्यात त्याने म्हटले की, बेअरस्टो आधी पुजारासारखा खेळत होता, विराटने त्याला पंत बनवले. बेअरस्टोने शतकी खेळी करताना संघाला २८४ धावांपर्यंत पोहोचवले.  

या घटनेबाबात जेम्स अँडरसनने ड्रेसिंग रुममध्ये काय चर्चा झाली ते सांगितले. तो म्हणाला,''जॉनी ८० धावांवर नाबाद होता आणि विराट कोहली त्याच्यासोबत स्लेजिंग करू लागला. विराटने त्याला डिवचण्यापूर्वी तुम्ही स्ट्राईक रेट पाहिलात की नाही, हे मला माहीत नाही. त्याचा स्ट्राईक रेट २०च्या आसपास होता आणि विराटने डिवचल्यानंतर तो १५० च्या आसपास गेला. लंच ब्रेकनंतर तो जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा म्हणाला, ही लोकं गप्प राहायला कधी शिकणार? जर तुमच्यासमोर बेअरस्टोसारखा फलंदाज आहे आणि त्याने तुमच्याविरुद्ध आक्रमक खेळू नये असे वाटत असेल, तर कशाला उगाच त्याला डिवचायचे.'' 

अँडरसनने यावेळी नवीन प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना विजयाचे श्रेय दिले. मॅक्युलमच्या येण्याने इंग्लंडच्या फलंदाजीचा अप्रोचच बदलला  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीजेम्स अँडरसन
Open in App