Join us  

Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे.

By मोरेश्वर येरम | Published: January 19, 2021 5:56 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीपासून या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, भारतात ही मालिका खेळविण्यात येणार आहे. लॉकडाऊननंतर भारतातील क्रिकेट पूर्णपणे बंद झालं होतं. आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील भारतातील क्रिकेटला पुन्हा नव्यानं सुरुवात होईल. 

ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघ निवडला जाणार आहे. अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला कसोटी मालिका विजय प्राप्त करुन दिला आहे. त्यामुळे रहाणेलाच कसोटी संघाचा कर्णधार ठेवण्याची मागणी केली जात आहे. पण बीसीसीआयकडून यावर कोणता निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

पहिल्या कसोटीनंतर माघारी परतला होता विराटऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीनंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला. या कसोटीत भारतीय संघाला मानहानीकारक पराभवला सामोरं जावं लागलं होतं. दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. त्यानंतरच्या पुढील तीन सामन्यांसाठी कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. 

अजिंक्यने विराटच्या अनुपस्थितीत संघाला दिलं खमकं नेतृत्वकोहली संघात नसल्याची उणीव अजिंक्यने भासून दिली नाही. रहाणेने मेलबर्न कसोटीत दमदार शतक ठोकून कर्णधारी खेळी साकारून संघातील खेळाडूंनी आत्मविश्वास दिला. भारताने मेलबर्न कसोटी जिंकली. तर सिडनी कसोटी भारताच्या खेळाडूंनी टिच्चून फलंदाजी करत अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. त्यानंतर अखेरच्या ब्रिस्बेन कसोटी विजय प्राप्त करुन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. या संपूर्ण मालिकेत अजिंक्यने आपल्यातील शांत व संयमी स्वभावानं सर्वांचं मन जिंकलं. तर मैदानात आक्रमक खेळी साकारून स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेविराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआय