सूर्याचा 'मोहरा' आता रोहितच्या संघाचाही 'चेहरा'! मिस्ट्री स्पिनरची अचानक वनडे संघात एन्ट्री

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून वनडे पदार्पणाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:54 IST2025-02-04T17:52:23+5:302025-02-04T17:54:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Varun Chakaravarthy Added To Team India’s Squad For ODI Series Against England | सूर्याचा 'मोहरा' आता रोहितच्या संघाचाही 'चेहरा'! मिस्ट्री स्पिनरची अचानक वनडे संघात एन्ट्री

सूर्याचा 'मोहरा' आता रोहितच्या संघाचाही 'चेहरा'! मिस्ट्री स्पिनरची अचानक वनडे संघात एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG Varun Chakaravarthy Added To Team India’s Squad For ODI Series : इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. नागपूरच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याआधी भारतीय संघानं मोठी चाल खेळली आहे. टी-२० मालिकेत ज्या फिरकीपटूनं इंग्लंडच्या संघाची गिरकी घेतली त्याला अचानक टीम इंडियाच्या वनडे संघात संधी देण्यात आलीये. वरुण चक्रवर्तीला कुणाच्या जागेवर संघात घेतलंय ते अद्याप स्पष्ट नाही, पण तो आगामी वनडे मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार आहे. टी-२० क्रिकेटनंतर आता तो वनडेत पदार्पण करताना दिसेल. एवढेच नाही तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही त्याला तिकीट मिळू शकते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 
 

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत वरुण चक्रवर्तीचा जलवा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेआधी या दोन्ही संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात वरुण चक्रवर्तीनं या मालिकेत खास छाप सोडली होती. ५ सामन्यात १४ विकेट्स घेत त्याने टीम इंडियाच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता. सर्वोच्च कामगिरीसह त्याने मालिकावीर पुरस्कारही पटकवला.  

वनडे पदार्पणाची संधी, चॅम्पियन्स ट्रॉफीचही मिळू शकतं तिकीट

वरुण चक्रवर्तीनं आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यातून आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत १८ सामन्यातील १८ डावात त्याने ३३ विकेट्स आपल्चया खात्यात जमा केल्या आहेत. यात दोन वेळा ५ विकेट्सचा पराक्रमही त्याने करून दाखवला आहे.  

वनडे पदार्पणाच्या संधीसह दुबईचं तिकीटही मिळणार

  वरुण चक्रवर्तीनं  देशांतर्गत क्रिकेटमधील लिस्ट-ए कारकिर्दीत २३ सामने खेळले आहेत.  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेती मागच्या हंगामात त्याने तमिळनाडूकडून खेळताना ६ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकत तो भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. एवढेच नाही तर इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश झाल्यामुळे त्यालासाठी दुबईचं तिकीटही मिळू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तो भारतीय संघासोबत दुबईला जाणार का ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: IND vs ENG Varun Chakaravarthy Added To Team India’s Squad For ODI Series Against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.