IND vs ENG Test Series ( Marathi News ) : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) वैयक्तिक कारणांमुळे विश्रांतीची विनंती केली होती आणि मान्य केली गेली आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच त्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे, परंतु काही वैयक्तिक परिस्थिती त्याच्या उपस्थितीची मागणी करत आहेत, असे विराटने BCCI ला कळवले.
बीसीसीआयने त्यांच्या निर्णयाचा आदर केला आहे. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयने मीडिया आणि चाहत्यांना विनंती केली आहे की, यावेळी विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्याच्या वैयक्तिक कारणास्तव अंदाज लावण्यापासून परावृत्त राहा.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
IND vs ENG Test Series
२५ ते २९ जानेवारी - हैदराबाद, सकाळी ९.३० वाजल्यापासून
०२ ते ०६ फेब्रुवारी - विशाखापट्टणम, सकाळी ९.३० वाजल्यापासून
१५ ते १९ फेब्रुवारी - राजकोट, सकाळी ९.३० वाजल्यापासून
२३ ते २७ फेब्रुवारी - रांची, सकाळी ९.३० वाजल्यापासून
७ ते ११ मार्च - धर्मशाला, सकाळी ९.३० वाजल्यापासून