Join us  

IND vs ENG: अश्विनची नवीन हेअर स्टाईल अन् रवी शास्त्रींचा इंग्लंडला इशारा; उद्यापासून 'कसोटी'

IND vs ENG Test Series: २५ तारखेपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 2:19 PM

Open in App

England’s tour of India 2024: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. भारतीय संघ मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी बीसीसीआयने वार्षिक पुरस्कारांचे वाटप केले. या कार्यक्रमात बोलताना भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रविचंद्रन अश्विनचा दाखला देत पाहुण्या इंग्लिश संघाला इशारा दिला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उद्या सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. 

नमन पुरस्कार सोहळ्यात रवी शास्त्री म्हणाले की, अश्विनने नुकतेच सांगितले की, मी आणखी चांगली कामगिरी करण्यावर भर देत आहे. आता त्याने नवीन हेअर स्टाईल केली आहे आणि त्याच्या डोक्याला केसांपासून स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यामुळे हवा डोक्यात चांगल्या प्रकारे जात आहे. आता तो काय विचार करत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता? कधी तिसरा तर कधी चौथा असू शकतो. हे इंग्लंडच्या संघाला लवकरच कळणार आहे." शास्त्रींच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

आर अश्विनची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. त्याने १९ कसोटी सामन्यांमध्ये ८८ बळी घेतले आहेत. त्याला सहावेळा एका डावात पाच बळी घेता आले, तर एका डावात सहा बळी घेण्यात यश आले. अश्विन भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जेम्स अँडरसननंतरचा दुसरा गोलंदाज होण्यापासून फक्त १२ बळी घेण्यापासून दूर आहे.

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवी शास्त्रीआर अश्विनभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय