Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ती एक चूक आम्हाला महागात पडली.."; सेमीफायनल हरल्यावर इंग्लंडच्या कर्णधाराची प्रामाणिक कबुली

IND vs ENG Semi Final: भारताने अवघ्या ७ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:21 IST

Open in App

IND vs ENG Semi Final, T20 World Cup 2026: स्पर्धेत भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची कामगिरी निराशाजनक होती. ब्रूकने प्रथम संजू सॅमसनचा झेल सोडला. त्यावेळी फक्त १५ धावांवर खेळ होता. त्यानंतर ब्रूकची फलंदाजीची फारशी चांगली होऊ शकली नाही. त्याने केवळ ७ धावाच केल्या आणि इंग्लंडनेही सामना ७ धावांनी गमावला. सेमीफायनलचा सामना गमावल्यानंतर हॅरी ब्रूकने आपल्या भावना मांडल्या. त्यावेळी त्याने एक चूक मान्य केली, ज्यामुळे इंग्लंडने सामना हरला.

ती चूक कोणती?

जेव्हा हॅरी ब्रूकने संजू सॅमसनचा झेल सोडला, तेव्हा तो फारसा चांगल्या लयीत दिसत नव्हता. चुकीचा अंदाज लावल्याने त्याच्या हातून संजूचा झेल सुटला. तो कॅच सोडल्यानंतर पुढे सॅमसनने पुढील ३५ चेंडूंमध्ये आणखी ७४ धावा ठोकल्या, ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या गाठता आली. इंग्लंडच्या पराभवानंतर इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला, "मी कबूल करतो की मी संजू सॅमसनचा झेल सोडून मोठी चूक केली. झेल सामने जिंकवतात. दुर्दैवाने, माझ्याकडून झेल सुटला आणि सामना हळूहळू आमच्या हातून निसटला. ही सल नेहमीच माझ्या मनात राहिल. मी सतत स्कोअरबोर्डकडे पाहत होतो आणि तो धावा काढत होता. तो जेव्हा बाद झाला, तेव्हा मी विचार करत होतो की माझ्यामुळे भारताला ८९ धावा मिळाल्या. माझ्या चुकीमुळे सामना गेला असं मला वाटतं"

भारत vs इंग्लंड Semi-Final Match Highlights

कोच काय म्हणाले?

ब्रेंडन मॅक्युलमने स्काय स्पोर्ट्सला सांगितले, "मी विशेषतः त्याचे दोन झेलांबाबत बोलेन. या मैदानावर क्षेत्ररक्षण करणे सोपे नाही, विशेषतः जेव्हा खूप आवाज असतो आणि चेंडू सर्वत्र फिरत असतो. अक्षर पटेलने घेतलेल्या झेलने सामन्यात फरक निर्माण केला. हॅरी ब्रूकचा झेल इंग्लंडसाठी आणखी निराशाजनक होता कारण तो संजू सॅमसनच्या दमदार सुरुवातीदरम्यान आला होता, ज्याने पॉवरप्लेमध्ये २० चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. इंग्लंड पहिल्या सहा षटकांमध्ये गोलंदाजी करण्यात फारसा यशस्वी झाला नाही आणि जोफ्रा आर्चर वारंवार शॉर्ट बॉल टाकत होता. त्यामुळे इंग्लंडचा प्लॅन फसला," असे ते म्हणाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Costly Mistake: England Captain Admits Error After Semifinal Loss

Web Summary : Harry Brook, England's captain, admitted his dropped catch of Sanju Samson proved costly in their semifinal loss to India. Samson capitalized, scoring crucial runs. Brook lamented the error, believing it significantly impacted the game's outcome. Coach McCullum highlighted fielding difficulties and strategic failures.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध इंग्लंड