‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...

सुनील गावसकर नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:27 IST2025-07-25T16:22:09+5:302025-07-25T16:27:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Sunil Gavaskar Blasts Over ICC Concussion Rule Demands Change After Rishabh Pant Fracture | ‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...

‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rishabh Pant Fracture Sunil Gavaskar Blasts Over ICC on Concussion Rule : भारताचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी आयसीसीच्या 'कन्कशन सब्स्टीट्यूट' (Concussion Substitute) नियमावर सडकून टीका केली आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यात भारताचा विकेट किपर बॅटर रिषभ पंत याच्या उजव्या पायाच्या करंगळी जवळ चेंडू लागला अन् त्याला दुखापत झाली. पायाला फॅक्चर असल्याचे निदान झाले असतानाही त्याला बॅटिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ आली. कारण या परिस्थितीत बदली खेळाडूच्या रुपात अन्य कोणी खेळाडू बॅटिंग करु शकत नाही. या मुद्यावरून गावसकरांनी 'कन्कशन सब्स्टीट्यूट' (Concussion Substitute) नियमातील त्रूटी काढत रिषभ पंतच्या दुखापतीमुळे (Rishabh Pant Fracture) निर्माण झालेल्या परिस्थितीत ICC नं बदली खेळाडूच्या नियमात बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

... तर टेनिस किंवा गोल्फ खेळायला जा

गावसकर सोनी स्पोर्ट्सवरील खास शोमध्ये  'कन्कशन सब्स्टीट्यूट'च्या नियमासंदर्भात म्हणाले की, 'मला नेहमी या गोष्टीची खंत वाटते की, अपयशासाठी तुम्ही बदली खेळाडूचा पर्याय दिला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू खेळण्याची क्षमता नसेल तर कसोटी खेळूच नका.  टेनिस किंवा गोल्फ खेळायला जा. 'कन्कशन सब्स्टीट्यूट'च्या नियमात जो खेळाडू चेंडूचा सामना करू शकला नाही त्याला बदली खेळाडूची लाइक टू लाइक रिप्लेसमेंट दिली जाते. हे अयोग्य वाटते, असे गावसकरांनी म्हटले आहे.  

रिषभ पंतच्या जागी दुसरं कोणी फलंदाजी करू शकतो का? काय आहे नियम!

रिषभ पंतसारख्या परिस्थितीत बदली खेळाडूचा पर्याय का नाही? नियम बदला

डोक्याला चेंडू लागल्यावर 'कन्कशन सब्स्टीट्यूट'च्या रुपात बदली खेळाडूला परवानगी दिली जाते. मग रिषभ पंतसारख्या दुखापतीनंतर बदली खेळाडूचा नियम का नाही? असा प्रश्न गावसकरांनी उपस्थितीत केलाय. एवढेच नाही तर मैदानात खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे स्पष्ट दिसत असेल तर इथंही बदली खेळाडू मिळायला हवा. आयसीसीने यासंदर्बात गांभीर्याने विचार करावा. एक स्वतंत्र समिती नेमावी. त्यात वैद्यकीय तज्ज्ञ असावेत. जे या परिस्थितीत योग्य निर्णय घेतील, असा सल्ला सल्लाही गावसकरांनी ICC ला दिला आहे.

मायकेल वॉन याला पटलं गावसकरांचे मत, माजी क्रिकेटर म्हणाला की,.... 

या चर्चेत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही गावसकरांच्या सूरात सूर मिसळल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या माजी क्रिकेरट फुटबॉलचा दाखला देत म्हणाला की, फुटबॉलमध्ये कोणताही खेळाडू मॅचमध्ये दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या बदली अन्य कोणताही खेळाडू मैदानात उतरू शकतो. हाच नियम क्रिकेटमध्येही असायला हवा. पंत पाय फॅक्चर झाल्यामुळे खेळू शकत नाही. या परिस्थितीत लाइक टू लाइक रिप्लेसमेंटचा नियम असायला हवा.


 

Web Title: IND vs ENG Sunil Gavaskar Blasts Over ICC Concussion Rule Demands Change After Rishabh Pant Fracture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.