इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिल हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यात इंग्लंडने २-१ आघाडी घेतली आहे. या मालिकेत गिलने ६०० हून अधिक धावा केल्या असून त्याच्याकडे इतिहास रचण्याची संधी आहे. गिलने आतापर्यंत फक्त ३५ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात आहे.
सर्वाधिक धावाशुभमन गिलने ३५ कसोटी सामन्यांच्या ६५ डावांमध्ये ४१.६६ च्या सरासरीने २ हजार ५०० धावा केल्या आहेत. दुसरीकडे, सचिन तेंडुलकरने ३५ कसोटी सामन्यांनंतर ५१ डावांमध्ये फलंदाजी करताना ५२.७१ च्या सरासरीने २ हजार ४२५ धावा केल्या.
सर्वाधिक शतके आणि अर्धशतकेशुभमन गिलने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ८ शतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याने ६ अर्धशतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून ३५ कसोटी सामन्यांमध्ये ८ शतके आणि १२ अर्धशतके झळकली आहेत.
सर्वोत्तम धावसंख्याशुभमन गिलचा ३५ कसोटी सामन्यांमधील सर्वोत्तम धावसंख्या २६९ धावा आहे. तर सचिन तेंडुलकरचा ३५ कसोटी सामन्यांमधील सर्वोत्तम धावसंख्या १७९ धावा आहे. गिलने ३५ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ४ हजार ४ चेंडूंचा सामना केला आहे. सचिन तेंडुलकरने ३७ कसोटी सामन्यांमध्ये ४ हजार ६९९ चेंडूंचा सामना केला.
सर्वाधिक चौकार आणि षटकारशुभमन गिलची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकरशी केली जाते. कारण दोघांनीही त्यांच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली होती. शुभमन गिलने ३५ कसोटी सामन्यांमध्ये २७६ चौकार आणि ३६ षटकार मारले आहेत. तर, सचिन तेंडुलकरने ३१२ चौकार आणि ५ षटकार मारण्यात यश मिळवले.