Cricketers Reaction Aftet India Clinch Must Win Game to Avoid Series Defeat : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड-भारत यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात आला. अखेरच्या दिवशी ४ विकेट्स हातात असताना इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. इंग्लंडच्या बाजूनं झुकलेल्या सामन्यात पाचव्या दिवसाच्या खेळात मियाँ मॅजिक दिसलं अन् टीम इंडियानं २८ धावांत ४ विकेट्स घेत अविस्मरणीय विजय नोंदवला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह भारताच्या दिग्गज क्रिकेटर्संनी भारतीय संघाच्या विजयावर खास शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मास्टर ब्लास्टरनं खास शब्दांत थोपटली टीम इंडियातील खेळाडूंची पाठ
क्रिकेटचा देव अन् भारत-इंग्लंड यांच्यातील स्पर्धेला ज्याचं नाव देण्यात आले त्या सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचा खास क्षण शेअर करताना भारतीय संघातील खेळाडूंना सुपरमॅन असं संबोधलं आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या कसोटीतील विजय खूप खास असल्याचे व्यक्त होताना तेंडुलकरनं टीम इंडियाला १० पैकी १० गुणही दिले आहेत.
टेस्ट इज बेस्ट
जबरदस्त विजय! टीम इंडियानं संघर्षाचा सामना करत सर्वोत्तम प्रयत्न करून मिळवलेल्या विजयासह मालिका खास केली. भारतीय संघाने जो खेळ दाखवला त्यात कसोटी क्रिकेट हेच सर्वोत्तम आहे, हे देखील दिसून आले, असे म्हणत माजी सलामीवीर वीरेंद्र सेवागनं टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केलाय.
कॅच सोडला, पण...
मोहम्मद कैफनं विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मोहम्मद सिराजचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सिराजनं कॅच सोडला, पण त्याने जिद्द सोडली नाही. ८० षटके टाकून जुन्या झालेल्या चेंडूवर त्याने १४०kph वेगाने चेंडू टाकून आश्चर्यचकित करुन सोडले. देशासाठी त्याने जी धमक दाखवलीये, ती कमालीची होती, अशा आशयाच्या शब्दांत मोहम्मद कैफनं टीम इंडियाच्या विजयात सिराजचा वाटा किती महत्त्वाचा होता, त्यावर भर दिला आहे.