Join us

विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बुमराह खेळला ती मॅच टीम इंडियानं गमावली; विकेटची गॅरेंटी देणाऱ्या गोलंदाजाची आकडेवारी पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:21 IST

Open in App

Sachin Tendulkar on Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा टीम इंडियातीलच नव्हे तर क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. विकेट हवी असेल तर बुमराहकडे चेंडू द्या अन् टेन्शन फ्री व्हा, ही गोष्ट अनेकदा अनुभवायला मिळालीये. पण बुमराहसंदर्भात आणखी एक धक्कादायक अन् भयावह आकडेवारी सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसते. ज्यावेळी जसप्रीत बुमराह कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला त्यातील बहुतांश वेळा टीम इंडियाच्या पदरी पराभव पडलाय. या आकडेवारीवर आता क्रिकेटचा देव अन् विक्रमादित्य सचिन तेंडुलकरनं प्रतिक्रिया दिली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बुमराह खेळला ती मॅच टीम इंडियानं गमावली

इंग्लंड दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह फक्त ३ सामने खेळला. यातील लीड्स आणि लॉर्डसच्या मैदानातील सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'

 बुमराहच्या या आकडेवारीवर विश्वास बसणार नाही

बुमराहसह मैदानात उतरल्यावर टीम इंडियाने ४८ कसोटीपैकी २० सामने जिंकले असून २२ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याउलट त्याच्याशिवाय खेळताना २८ पैकी २० कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. ही आकडेवारी जगात भारी असलेल्या जसप्रीत बुमराहच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मात्र ही  मात्र भारतीय संघाच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाजाची पाठराखण केलीये.  

जस्सीच्या भयावह आकडेवारीवर सचिनची प्रतिक्रिया, म्हणाला...

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडसंदर्भातील मुद्दा गाजला. आता ही मालिका संपल्यावर जसप्रीत बुमराह खेळला त्या मॅचमध्ये संघाला पराभवाचा सामान करावा लागला, ही गोष्ट चर्चेत आहे. यावरुन जसप्रीत बुमराहला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येत आहे. आता त्यावर सचिन तेंडुलकरनं प्रतिक्रिया दिलीये. रेडिटवरील व्हायरल व्हिडिओमध्ये सचिनने यावर भाष्य केल्याचे दिसते. तो म्हणाला आहे की, मला माहितीये लोक बरेच काही बोलत आहेत. ज्या मॅचमध्ये बुमराह खेळला नाही त्यात आपण जिंकलो. माझ्यासाठी हा फक्त एक योगायोग आहे. 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडुलकर