ENG vs IND Rishabh Pant Broke MS Dhoni Record : इंग्लंड विरुद्धच्या लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रिषभ पंतनं शतकी खेळीसह महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाला सुरुंग लागवला. कसोटी कारकिर्दीतील सातव्या शतकासह रिषभ पंत आता भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारा विकेट किपर बॅटर ठरला आहे. शतकी खेळीनंतर रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत सेलिब्रेशन साजरे केले. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत ६ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. त्याचा हा विक्रम आता मागे पडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीपेक्षा जलद! फक्त ७६ डावात साधला मोठा डाव
महेंद्रसिंह धोनीनं १४८ डावात ६ शतके झळकवली होती. रिषभ पंतनं अवघ्या ७६ व्या डावात धोनीला मागे टाकत ७ कसोटी शतकासह नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वृद्धिमान साह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५४ डावात ३ शतके झळकवल्याचा विक्रम आहे.
इंग्लंडमध्येही दिसला IPL मधील त्याचा तो तोरा
इंग्लंड दौऱ्याआधी रिषभ पंत आयपीएल स्पर्धेत फ्लॉप ठरला होता. लखनौच्या संघाने विक्रमी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्याच्याकडे नेृत्वाची जबाबदारी देखील दिली. पण तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. पण शेवटच्या सामन्यात शतकी खेळीसह त्याने टी-२० च्या सामन्यातून कसोटीसाठी तयार असल्याचे संकेत दिले होते. आयपीएलमधील शतकी खेळीनंतर त्याने कोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केले. अगदी तोच तोरा त्याने हेडिंग्लेच्या मैदानातही दाखवला. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Web Title: IND vs ENG Rishabh Pant Broke MS Dhoni Record Now He Has Most Test Hundreds For India As Wicketkeepers Batter Watch Celebration
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.