नुसती 'विराट' भेट नव्हे थेट 'गळाभेट'! कोण आहे ती मिस्ट्री लेडी? कोहलीची पाहुणी की भाग्यवान चाहती?

विराट कोहलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, अनेकांना पडलाय ती मिस्ट्री लेडी कोण? हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:25 IST2025-02-11T13:12:13+5:302025-02-11T13:25:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG ODI Virat Kohli Evades Security To Hug Mystery Woman At Airport Who's she internet scrambles to know her identity | नुसती 'विराट' भेट नव्हे थेट 'गळाभेट'! कोण आहे ती मिस्ट्री लेडी? कोहलीची पाहुणी की भाग्यवान चाहती?

नुसती 'विराट' भेट नव्हे थेट 'गळाभेट'! कोण आहे ती मिस्ट्री लेडी? कोहलीची पाहुणी की भाग्यवान चाहती?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा फिल्डशिवाय फिल्ड बाहेरील गोष्टींमुळेही नेहमीच चर्चेत असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते 'विराट' गर्दी करतात. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो फक्त एक मॅच खेळला. त्यातही त्याला दमदार कामगिरी करता आली नाही. त्याच्या फ्लॉप शोनंतर चाहते निराश होतात, पण त्याची क्रेझ काही कमी होत नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ती कोण?  विराट कोहलीनं घेतली गळाभेट  

आता विराट कोहलीचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीनं एका महिलेची गळाभेट घेतल्याचे दिसून येते. आता विराट नुसतं भेटणं म्हणजे मोठी गोष्ट त्यात थेट विराट कोहलीनं तिची गळाभेट घेतली म्हटल्यावर ती आहे तरी कोण? असा प्रश्न पडणार नाही असं कसं होईल. 

गर्दीतून विराटनं तिला ओळख दिली अन्...

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर  भारतीय संघ भुवनेश्वर विमानतळावर अहमदाबादला जाण्यासाठी पोहोचला होता. भारतीय संघातील खेळाडूंसह कोहलीची झलक पाहण्यासाठी एअरपोर्टवरील सर्वांच्या नजरा भिरभिरत होत्या. कडक सुरक्षेत कोहलीनं चेक-इन करण्यासाठी एन्ट्री मारली. त्याला पाहण्यासाठी विमानतळावर चांगलीच गर्दी जमली होती. त्या गर्दीत असलेल्या एका महिलेची विराट कोहलीनं गळाभेट घेतल्याचा सीन पाहायला मिळाला. त्या महिलेशी अगदी थोडक्यात संवाद साधत  विराट आपल्या दिशेनं निघून गेला. आता ती मिस्ट्री लेडी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

पाहुणी की भाग्यवान चाहती?

कोहलीनं भुवनेश्वरच्या विमानतळावर एन्ट्री मारल्यावर ज्या महिलेला गळाभेट दिली ती नेमकी कोण? ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण कोहलीचा व्हिडिओ जर बारकाईनं पाहिला तर स्टार क्रिकेटरची देहबोली अन् त्याच्या चेहऱ्यावरील भाव तो या महिलेला आधीपासून ओळखत असावा असेच दिसून येते. त्यामुळे  गर्दीत लक्षवेधून घेणारी ती फक्त एक चाहती नव्हती तर ही महिला विराट कोहलीच्या ओळखीतील व्यक्तींपैकी एक असावी, असे वाटते. कोहलीच्या एका फॅन पेजवरून संबंधित महिला विराट कोहलीची नातेवाई असल्याचा दावाही करण्यात येत आहे. पण खरंच ती पाहुणी होती की भाग्यवान चाहती? याच खरं उत्तर सध्याच्या घडीला तर फक्त विराट अन् त्या महिलेकडेच आहे.   

Web Title: IND vs ENG ODI Virat Kohli Evades Security To Hug Mystery Woman At Airport Who's she internet scrambles to know her identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.