Join us

रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)

इंग्लंड बॅटर्संनी विकेट वाचण्यासाठी पेश केला होता फुटबॉल 'स्कील'चा नजारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:10 IST

Open in App

लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आलेला भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार झाला. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर रवींद्र जडेजाने तळाच्या फलंदाजीतील जसप्रीत बुमराह आणि सिराजच्या साथीनं धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. पण शेवटी टीम इंडियाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सिराज फुटबॉल 'स्कील' दाखवण्यात कमी पडला, अन् ....

बुमराहनं मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट गमावल्यावर सिराजनंही उत्तम बॅटिंग स्किल दाखवले. पण शोएब बशीरच्या बॉलिंगवर रोनाल्डोचा फॅन असलेला सिराज 'प्रेझेंस ऑफ माइंड'सह फुटबॉलचं 'स्कील' दाखवण्यात कमी पडला. जे इंग्लंडच्या बॅटर्संनी करून दाखवलं ते सिराजला जमलं नाही अन् त्यानं आपली विकेट गमावली. ही विकेट सिराज आणि टीम इंडियाच्या ताफ्यातील खेळाडूंसह भारतीय क्रिकेट चाहत्यांना निराश करणारी होती.

त्या चेंडूवर नेमकं काय घडलं? सिराज कसा फसला?

मोहम्मद सिराज हा फुटबॉल जगतातील स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोचा जबरा फॅन आहे. क्रिकेटच्या मैदानात विकेट्स  मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना तो रोनाल्डोच्या सेलिब्रेशन स्टाईल कॉपी करतानाही पाहायला मिळते. लॉर्ड्सच्या मैदानातील रंगतदार सामन्यात सिराजला बॅटिंग वेळी परफेक्ट डिफेन्स शॉट खेळल्यावर फुटबॉलचं स्कील दाखवण्याची गरज होती. त्याने तो प्रयत्न केला पण तो त्यात कमी पडला. ऑफ स्पिनर शोएब बशीरनं गूड लेंथवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर आत वळला. सिराजनं तो अगदी उत्तमरित्या बचावात्मकरित्या खेळला. पण बॅटला लागून खेळपट्टीवर पडलेला चेंडू पुन्हा स्टंपच्या दिशेनं गेला. सिराजनं पायाने चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. पण तो लेट झाला. सिराजची किक चुकली. चेंडू थेट लेग स्टंपवर आदळला, बेल्स पडली अन् टीम इंडियानं सिराजच्या विकेटसह मॅचही गमावली.

इंग्लंड बॅटर्संनी विकेट वाचण्यासाठी पेश केला होता फुटबॉल 'स्कील'चा नजारा 

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा विकेट किपर बॅटर जेमी स्मिथ बॅटची कड घेऊन स्टंपच्या दिशेनं जाणारा चेंडू रोखण्यासाठी कसरत करताना पाहायला मिळाले होते. क्रिकेटच्या मैदानात इंग्लंडच्या बॅटरनं दाखवलेले फुटबॉल स्कील चर्चेचा विषयही ठरला. सिराजच्या गोलंदाजीवर त्याने ही कसरत केली होती. १० धावांवर असताना त्याने आपली विकेट वाचली. त्यानंतर त्याने या डावात अर्धशतकी खेळी केल्याचे पाहाला मिळाले. 

आधी हॅरी ब्रूकनं  विकेट वाचवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात खेळला होता फुटबॉलचा डाव 

बर्मिंगहॅम येथील मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूक याने स्टंपवर जाणारा चेंडू बाजूला ढकलण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलच स्कील दाखवून देताना खांद्याने चेंडू बाजूला ढकलल्याचे पाहायला मिळाले होते. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराजरवींद्र जडेजा