आधी देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक; आता KL राहुल टीम इंडियातून OUT; कारण...

आधी देशांतर्गत क्रिकेटमधून आता टीम इंडियात बाहेर राहणार लोकेश राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:44 IST2025-01-10T18:43:50+5:302025-01-10T18:44:58+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG KL Rahul Wants Rest From ODI And T20 Series Against England He Request Selector Ajit Aagarkar | आधी देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक; आता KL राहुल टीम इंडियातून OUT; कारण...

आधी देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक; आता KL राहुल टीम इंडियातून OUT; कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. २२ जानेवारीपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनं भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंडचा संघ या दौऱ्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे.  टीम इंडियाचा स्टार बॅटर केएल राहुल या मालिकेचा भाग असणार नाही. खुद्द लोकेश राहुलनंबीसीसीआय निवड समितीची मुख्य अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडे विश्रांती मागितल्याचे वृत्त आहे. याआधी त्याने देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगत ब्रेक मागितला होता. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

KL राहुलनं स्वत: केलीये विनंती, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात संधी मिळेल का?

फिटनेस आणि मानसिक संतुलन याचा विचार करून बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेनंतर या क्रिकेटरनं विश्रांती घेण्याला पसंती दिल्याचे दिसते. पीटीआयनं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, 'केएल राहुल याने इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेतून ब्रेक मागितला आहे. पण तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल.' या परिस्थितीत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रिषभ पंत मुख्य विकेट किपरच्या रुपात टीम इंडियाचा भाग असेल. संजू सॅमसन बॅक विकेट किपरच्या रुपात संघात स्थान मिळू शकते. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लक्षवेधी कामगिरी

बॉर्डर गावककर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी खूपच निराश केले. यात लोकेश राहुल चमकला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यातील सर्व सामने खेळताना त्याने ३०.६६ च्या सरासरीनं २७६ धावा केल्या होत्या. 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात वर्णी लागणं  जवळपास निश्चित, पण...

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. लोकेश राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सिलेक्शनसाठी उपलब्ध असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. तो  चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेट किपर बॅटरच्या रुपात टीम इंडियाची पहिली पसंत असेल, अशी चर्चा रंगतीये. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी घेतलेली विश्रांती त्याचेच संकेत देणारी आहे. शेवटी सिलेक्शनवेळी काय घडणार ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: IND vs ENG KL Rahul Wants Rest From ODI And T20 Series Against England He Request Selector Ajit Aagarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.