करुण नायर याने इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून ८ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढणाऱ्या या पठ्ठ्यानं इंग्लंडमधील सराव सामन्यात द्विशतकही ठोकले. पण त्यानंतर पहिल्या तिन्ही सामन्यातील प्रत्येक डावात तो अपयशी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
करुण नायरचा पत्ता कट होणार अशी चर्चा, पण...
लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केलेली ४० धावा ही त्याची इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या ३ सामन्यातील ६ डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरलीये. चौथ्या कसोटी सामन्यातून त्याचा पत्ता कट होईल, अशी चर्चा रंगत असताना विदर्भ संघाचे कोच उस्मान गनी यांनी आपल्या पठ्ठ्याची पाठराखणे केलीये. एवढेच नाहीतर उर्वरित दोन्ही सामन्यात तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल, असा विश्वासही व्यक्त केलाय.
पांड्याची साथ! RCB च्या ताफ्यातून दिसलेल्या विदर्भकरानं बदलला संघ; कारण...
फक्त एक मोठी खेळी हवी, गंभीरची साथ मिळेल असा विश्वास
इंग्लंडमधील खराब कामगिरीनंतर एका बाजूला करुण नायर ट्रोल होत असताना विदर्भ संघाचे कोच उस्मान गनी यांनी त्याची पाठराखण केलीये. आठ वर्षांनी कमबॅक करणं ही काही सोपी गोष्ट नाही. फॉर्ममध्ये येण्यासाठी त्याला फक्त एका डावाची गरज आहे. त्याची जिद्द, कणखर मानसिकता अन् संघर्ष करण्याची वृत्ती पाहून भारतीय संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर त्याच्यावरील भरवसा कायम ठेवतील, असा विश्वासही उस्मान गनी यांनी व्यक्त केला आहे.
चांगल्या सुरुवातीनंतर अडखळला नायर
उजव्या हाताच्या फलंदाजाने पहिल्या ३ कसोटी सामन्यातील ६ डावात फक्त १३१ धावा केल्या आहेत. लॉर्ड्सच्या मैदानातील पहिल्या धावातील ४० धावांच्या खेळीसह प्रत्येक वेळी तो चांगली सुरुवात मिळाल्यावर बाद झाला. अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने गमावलेली विकेटही त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती. स्टंपवर आलेला चेंडू सोडण्याच्या नादात त्याने विकेट फेकली होती.
साई सुदर्शनचं नाव चर्चेत
करुण नायरच्या फ्लॉप शोनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी साई सुदर्शन याचे नाव चर्चेत आहे. एका सामन्यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मँचेस्टर कसोटी सामन्यात करुण नायरच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर या युवा खेळाडूला पसंती देण्यात येणार की, अनुभवी फलंदाजाला आणखी एक संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल.