Joe Root Big Statement On Mohammed Siraj भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये रंगलेला स्लेजिंगचा खेळही चांगलाच गाजला. शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजाने अर्थात जो रुटचाही संयम सुटला. प्रसिद्ध कृष्णासोबत तो भांडताना दिसून आले. याशिवाय रुटनं ओव्हलच्या मैदानातील भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मोहम्मद सिराजसंदर्भात केलेले वक्तव्यही लक्षवेधी ठरलं. सिराज दिसतो तसा नाही, तो 'सोंगाड्या' आहे, अशा आशयाचे वक्तव्य इंग्लंड बॅटरनं भारतीय गोलंदाजासंदर्भात केले आहे. भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना तो नेमकं तो काय म्हणालाय जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
ओव्हल कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर जो रुटनं पत्रकार परिषदेत संवाद साधला होता. यावेळी त्याने सिराजचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की, सिराज एक लढवय्या खेळाडू आहे. तो प्रत्येक वेळी संघासाठी सर्वोत्परी प्रयत्न करतो. गोलंदाजी वेळी तो कधी कधी आक्रमक अंदाज दाखवतो. पण ते काही त्याचं खरं रुप नाही. त्याचा अँग्री यगमॅन अवतार हा फक्त लोकांना दाखवण्यापुरता आहे. अशा आशयाचे वक्तव्य रुटनं केलं आहे. सिराज जसा दिसतो तसा तो नाही, तो जो राग काढतो तो खोटा असतो, असे सांगत रुटनं भारतीय जलदगती गोलंदाज 'सोंगाड्या' असल्याचे म्हटल्याचे दिसते.
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
जो रुटच्या सेंच्युरीवर भारी पडला सिराजचा 'पंजा'
ओव्हल कसोटी सामन्यात जो रुटनं दमदार खेळी करताना शतक झळकावले होते. सिराजनं हॅरी ब्रूकचा झेल सोडल्यावर सामना इंग्लंडच्या बाजूनं झुकला होता. या दोघांनी द्विशतकी भागीदारी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. पण शेवटी सिराजनं मॅचला कलाटणी दिली. पाचव्या दिवसाच्या खेळात फक्त ३५ धावांचा बचाव करताना सिराजनं तिघांना तंबूचा रस्ता दाखवत पंजा मारत संघाला अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकून दिला. या कामगिरी आधीच जो रुटनं भारतीय गोलंदाजाला लढवय्या म्हटलं होतं. सिराजनं अगदी त्याचा शब्द खरा ठरवल्याचे पाहायला मिळाले.