Join us

IND vs ENG : नसता खेळ महागात पडला, भारतीय खेळाडू तोंडावर आपटला, Video

India vs England : भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा वन डे सामना आता खेळवला जात आहे. भारताने ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:37 IST

Open in App

India vs England : भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा वन डे सामना आता खेळवला जात आहे. भारताने ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विक्रमी कामगिरी केली. आजचा वन डे सामना जिंकून ७ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाला आहे आणि कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीचे पुनरागमन ही भारतासाठी  आनंदाची बातमी आहे. पण, अशात इशान किशनचा ( Ishan Kishan) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात इशान तोंडावर पडलेला दिसतोय.

हा व्हिडीए एडबॅस्टन येथे झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यातला असल्याचे सांगण्यात येत आहे. यात इशान सहकारी खेळाडूंसोबत खेळताना दिसतोय. त्याने एका खेळाडूच्या डोक्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला अन् तो त्यात यशस्वीपण झाला. पण, पुढे तो तोंडावर पडल्याचे दिसतेय. त्यानंतर सर्व खेळाडू हसू लागले. 

दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यावरील पाच ट्वेंटी-२० सामन्यांसाठी निवडलेल्या संघात इशान किशनची निवड करण्यात आली आहे. भारताचा टी२० संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल*, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव*, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.*के एल राहुल आणि कुलदीप यादव यांचा समावेश फिटनेस टेस्टनंतर, असेही BCCI ने सांगितले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइशान किशन
Open in App