IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

India Tour Of England: भारताचा हा संघ कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 21:52 IST2025-05-16T21:50:13+5:302025-05-16T21:52:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG: India A squad for tour of England announced | IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली.  भारताचा हा संघ कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. या संघाची कमान बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आली आहे. तर, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि मधल्या फळीतील फलंदाज करुण नायर यांचाही संघात समावेश करण्यात आला. या सामन्यांचे उद्दिष्ट जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करणे आहे.

इंग्लंड दौऱ्यातील दोन सराव सामने ३० मे ते ६ जून दरम्यान होतील. पहिला सामना कॅन्टरबरी आणि दुसरा नॉर्थम्प्टन येथे खेळला जाईल. भारताच्या अ संघात ऋतुराज गायकवाड, हर्षित राणा, शार्दुल ठाकूर या युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला. या खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवण्याची आणि वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. यापैकी कोणता खेळाडू आपली छाप सोडण्यात यशस्वी होतो आणि वरिष्ठ संघात स्थान मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा 'अ' संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित अहमद, हर्षित कुमार, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे.

Web Title: IND vs ENG: India A squad for tour of England announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.