Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ravi Shastri : या खेळाडूला इंग्लंड विरुद्ध प्लेइंग 11 मध्ये करा सामील, रवि शास्त्रींनी केली शिफारस!

सध्या भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या रूपाने दोन स्टार यष्टीरक्षक आहेत. यामुळे आता कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडविरुद्ध कुणाला संधी देणार, हे बघण्यासारखे असेल. पण, यापूर्वीच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका स्टार खेळाडूला संधी देण्यासंदर्भात शिफारस केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 00:21 IST

Open in App

T20 विश्वचषक 2022 मधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 10 नोव्हेंबरला अॅडिलेडच्या मैदानावर खेळळा जाणार आहे. सध्या भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या रूपाने दोन स्टार यष्टीरक्षक आहेत. यामुळे आता कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडविरुद्ध कुणाला संधी देणार, हे बघण्यासारखे असेल. पण, यापूर्वीच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका स्टार खेळाडूला संधी देण्यासंदर्भात शिफारस केली आहे.

हा खेळा सिद्ध होऊ शकतो 'X Factor' -भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, की आपण अनुभवी दिनेश कार्तिक एवजी युवा ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू. भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबरला अॅडिलेडमध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ते म्हणाले, ऋषभ पंत हा संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो. या स्पर्धेसाठी भारताने कार्तिकला यष्टिरक्षक-कम-स्पेशालिस्ट फिनिशर म्हणून घेतले आहे, परंतु रविवारी मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या जागी पंतची निवड करण्यात आली.

या खेळाडूला मिळावी संधी - रवी शास्त्री म्हणाले, 'दिनेश कार्तिक हा संघासाठी एक उत्तम खेळाडू आहे. मात्र, जेव्हा विषय इंग्लंड अथवा न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याचा येतो, तेव्हा त्यांचे आक्रमण पाहता, आपल्याला एका चांगल्या लेफ्ट हँडेट फलंदाजाची आवश्यकता आहे, जो मॅच विनर ठरू शकेल, असे मला वाटते. 

England विरुद्ध चांगले प्रदर्शन -रवि शास्त्री म्हणाले, 'त्याने इंग्लंड विरुद्ध चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने नुकतेच इंग्लंड विरुद्ध आपल्या बळावर सामना जिंकला होता. मी पंतची निवड करेन. तो केवळ येथे खेळला म्हणून नाही, तर तो उपांत्यसामन्यात एक्स फॅक्टर ठरू शखतो.' 

टॅग्स :रवी शास्त्रीरिषभ पंतदिनेश कार्तिकभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App