Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC U 19 World Cup Final Record : रेकॉर्ड ब्रेकर! कुणाला नाही जमलं ते युवा टीम इंडियानं करुन दाखवलं

यूथ वनडेत टीम इंडियानं तिसऱ्यांदा उभारली ४०० पेक्षा अधिक धावसंख्या, कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:07 IST

Open in App

ICC U 19 World Cup Final World Record : युवा टीम इंडियाने अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या संघासमोर विक्रमी धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले.  वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक १७५ (८०) आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या अर्शतकी खेळीसह ५३ (५१) अन्य खेळाडूंनी केलेल्या दिमाखदार फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ४११ धावा केल्या. 

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

U19 वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला भारत  

अंडर १९ वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्लेऑफ्समध्ये ३५० पेक्षा अधिक धावा उभारणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. याआधीही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम भारतीय संघाच्या नावेच होता.  २१६ मध्ये फतुल्लाह येथे नामिबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत युवाटीम इंडियाने रिषभ पंतचच्या ९६ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३४९ धावा काढल्या होत्या.

१५ षटकार, १५ चौकार; ८० चेंडूत १७५ धावा! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने मोडले तब्बल ४ विक्रम

यूथ वनडेत टीम इंडियानं तिसऱ्यांदा उभारली ४०० पेक्षा अधिक धावसंख्या, कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

दहाव्यांदा  U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल खेळताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना युवा टीम इंडियाने यूथ वनडेत तिसऱ्यांदा ४०० पेक्षा अधिक धावा केल्या. अन्य कोणत्याही संघाला एकपेक्षा अधिक वेळा एवढी मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. याआधी U19 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. २०२४ मध्ये कांगारुंच्या युवा टीमनं ७ विकेट्सच्या मोबदल्यात २५३ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात फायनलमध्ये ४११ धावांसह युवा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा विक्रमच मोडला नाही तर अशक्यप्राय टार्गेट सेट करत पहिल्या डावातच फायलची  अर्धी लढाई जिंकल्याचे पाहायला मिळाले.

सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावे

U19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रमही टीम इंडियाच्या नावे आहे. यंदाच्या हंगामातील सेमीफायनलमध्येच भारतीय संघाने ही कामगिरी करून दाखवली होती. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ३११ धावांचा यशस्वी पाठलाग करत दहाव्यांदा फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.   

English
हिंदी सारांश
Web Title : U19 World Cup: India Shatters Records, Sets Unreachable Target in Final!

Web Summary : India's U19 team set a monumental 411-run target in the World Cup final, fueled by Vaibhav Suryavanshi's explosive century (175 off 80) and captain Aayush Mhatre's half-century. This is the first time a team has crossed 350 in the playoffs and the third time India has crossed 400 in U19 cricket.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपवैभव सूर्यवंशीआयुष म्हात्रेभारत विरुद्ध इंग्लंड19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनल