Join us  

IND vs ENG : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; पाचव्या सामन्यासाठी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज परतला

India vs England, T20I Series - भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 4:40 PM

Open in App

India vs England, T20I Series - भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे. शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) एकाच षटकात सलग दोन विकेट्स घेत इंग्लंडला जबरदस्त धक्के दिले. तत्पूर्वी, सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) फटकेबाजी करून भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. त्यामुळे मालिकेत पिछाडीवर असलेल्या टीम इंडियानं मुसंडी मारली आणि आता शनिवारी होणाऱ्या पाचव्या व अंतिम सामन्यात दोन्ही संघ जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन ( T Natarajan) यानं फिटनेस टेस्ट पास केली असून तो पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. भारतीय संघ निवडताना वय हा निकष असता कामा नये; सचिन तेंडुलकरचं स्पष्ट मत

नटराजननं गुरुवारी इंस्टाग्राम स्टोरीवर वॉशिंग्टन सुंदरसोबत फोटो पोस्ट करून ही बातमी दिली. त्यानं लिहिलं की,''भारतीय संघाच्या ताफ्यात दाखल झाल्याचा आनंद आहे.'' ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी नटराजननं तीनही फॉरमॅटमधून टीम इंडियाकडून पदार्पण केलं होतं. २९ वर्षीय गोलंदाजांना ऑसी फलंदाजांना हैराण केलं होतं. खांदा व गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त असलेल्या नटराजन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी दाखल झाला होता. वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी

BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं PTI ला सांगितले की,''नटराजननं यो-यो टेस्ट व दोन किलोमीटर धावण्याची परीक्षा पास केली आहे. तो काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे दाखल झाला आणि त्यानंतर तो बायो बबलमध्ये क्वारंटाईन झाला होता. आज त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आणि तो आता संघासोबत डगआऊटमध्ये जाऊ शकतो. तो ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी उपलब्ध आहे.''  नटराजननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांत १३.८च्या सरासरीनं ६ विकेट्स घेतल्या होत्या. एका वन डे सामन्यात दोन विकेट्स आणि एका कसोटीत तीन विकेट्स घेत विजयात मोलाचे योगदान दिले होते.   इंग्लंडच्या पराभवामागे रोहित शर्माचं डोकं; शार्दूल ठाकूरला दिला मंत्र अन् टीम इंडियाची बाजी  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडटी नटराजन