Join us

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावरून माघार घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरची दुखापत खरी की खोटी?; त्याचं वागणं पाहून कुणालाही पडेल हा प्रश्न

Ind vs Eng: Washington Sundar ruled out for 6 weeks with finger injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यानं बोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याचे वृत्त गुरुवारी धडकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:58 IST

Open in App

Ind vs Eng: Washington Sundar ruled out for 6 weeks with finger injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यानं बोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याचे वृत्त गुरुवारी धडकले. वॉशिंग्टन सुंदर सहा आठवड्यांसाठी मैदानाच्या बाहेर राहणार आहे. पण, हे वृत्त समोर आल्यानंतर लगेचच वॉशिंग्टन सुंदर मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी उतरलेला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर कौंटी एकादश संघाकडून खेळताना त्यानं टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवाल याचा झेलही घेतला. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संभ्रमावस्तेत आहेत. 

IPL Cheerleaders Salaries :मुंबई इंडियन्स अन् KKR चीअर लीडर्सना द्यायचे सर्वाधिक पगार; मॅच जिंकल्यावर मिळायचा 6500 रुपयांचा बोनस!

सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुंदरनं बोटाच्या दुखापतीमुळे मैदान सोडले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वॉशिंग्टनं इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाही. तो मायदेशात परतणार आहे. पण, असे असूनही वॉशिंग्टन सराव सामन्यात दिसल्यानं चाहते नाराज झाले. वॉशिंग्टनची दुखापत खरी की खोटी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. भारताच्या पहिल्या डावातील 311 धावांच्या प्रत्युत्तरात कौंटी एकादशनं हसीब हमीदच्या 112 धावांच्या जोरावर 220 धावा केल्या. भारतानं दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांना सलामीला पाठवले अन् दोघांनी 87 धावांची सलामी दिली. जॅक कार्लसननं टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला 47 धावांवर बाद केले. वॉशिंग्टननं हा झेल टिपला. त्यानंतर कार्लसननं 38 धावांवर चेतेश्वर पुजारालाही माघारी पाठवले. भारताला 98 धावांत 2 धक्के बसले.

टॅग्स :वॉशिंग्टन सुंदरभारत विरुद्ध इंग्लंड