Join us

IND Vs ENG : स्मृती मानधनाला पहिल्याच सामन्यात अपयश

भारताचा अर्धा संघ ४६ धावांमध्ये माघारी परतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 21:15 IST

Open in App

गुवाहाटी : भारतीय महिला संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी स्मृती मानधनाला मिळाले होते. पण पहिल्याच सामन्यात स्मृतीला अपयश आले आहे. कारण पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला इंग्लंडकडून ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

पहिल्याच सामन्यात नाणेफेकिचा कौल स्मृतीच्या बाजूने लागला आणि तिने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या तम्सीन बिओमाँटने यावेळी दमदार खेळी साकारली. तम्सीनने ५७ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ६२ धावांची तडफदार खेळी साकारली. तिच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने २० षटकांमध्ये ४ बाद १६० अशी मजल मारली.

इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली नाही. भारताचा अर्धा संघ ४६ धावांमध्ये माघारी परतला. त्यामुळे भारताला २० षटकांमध्ये ६ फलंदाज गमावत ११९ धावाच करता आल्या. स्मृतीला यावेळी फक्त दोन धावाच करता आल्या.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ