Join us

टीम इंडियानं 'बॅझबॉल'चा भूत पळवलं; आता इंग्लंडच्या ताफ्यात शिजतोय हा प्लॅन, पण...

टीम इंडियात यजमानांचा प्लॅन त्यांच्यावर उलटण्याची ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:37 IST

Open in App

इंग्लड-भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा  सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार आहे. पहिल्या सान्यातील पराभवानंतर टीम इंडियाने एजबॅस्टनच्या मैदानात पलटवार करत मालिकेत बरोबरी साधलीये. पहिल्या दोन सामन्यातील टीम इंडियाचा तोरा बघितल्यावर इंग्लंडचा संघ बॅझबॉलचा नाद सोडून आता आपल्या पूर्वीच्या ट्रॅकवर येत टीम इंडियासमोर आव्हान निर्माण करण्याचा डाव आखत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंग्लंड जुना डाव नव्यानं खेळणार,  खेळपट्टीचा रंग बदलणार!

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंडचा कोच आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ब्रेंडन मॅक्युलम याने पिच क्यूरेटर कार्ल मॅक्डरमोट यांच्याकडे अधिक उसळी घेणारी आणि जलगती गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी मिळावी, अशी मागणी केलीये. यासाठी इंग्लंडच्या कोचनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याचा दाखलाही दिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात गोलंदाजांना मदत मिळाली होती. 

SENA देशांत टीम इंडिया नंबर वन! इंग्लंडच्या खांद्यावरून साधला पाकवर निशाणा

इंग्लंडच्या ताफ्यात या दोघांची एन्ट्री निश्चित

लॉर्ड्सच्या मैदानात रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जोफ्रा आर्चरची एन्ट्री पक्की मानली जात आहे. याशिवाय गस ॲटकिन्सन यालाही संघात स्थान दिले जाऊ शकते. जोफ्रा आपल्या वेग आणि उसळत्या चेंडूसह तर गस ॲटकिन्सन स्विंग अन् सीमनं भारतीय फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करू शकतो.

टीम इंडियात यजमानांचा प्लॅन त्यांच्यावर उलटण्याची ताकद

लॉर्ड्सच्या मैदानातील खेळपट्टी ही गोलदाजांसाठी अधिक अनुकूल असली तर भारतीय संघही इथं कमी पडणार नाही. दुसऱ्या सामन्यातील विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह कमबॅकसाठी सज्ज असेल. आकाशदीपसोबत त्याची जोडी जमली तर यजमानांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटण्याचा यशस्वी डाव टीम इंडियाला सहज खेळता येईल. 

बॅझबॉलमुळे देत होते सपाट खेळपट्टीला पसंती, आता पुन्हा जुन्या ट्रॅकवर 

इंग्लंडमधील खेळपट्टी ही तशी गोलंदाजांसाठीच अनुकूल असते. पण ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडचा कोच झाल्यापासून संघ बॅझबॉल रणनिती आजमावताना दिसते. परिणामी इथंल्या मैदानात सपाट खेळपट्टी पाहायला मिळते. २०-३० षटकातच गोलंदाजांना सीम अँण्ड स्विंगचा खेळ खेळता येतो. पण टीम इंडियासमोर इंग्लंडचा बॅझबॉल क्रिकेटचा डाव फसल्याचे दिसते. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाने आता जुना डाव पुन्हा नव्याने खेळण्याचा डाव आखल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजोफ्रा आर्चरजसप्रित बुमराहआकाश दीप