Join us

IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद

या नव्या चेहऱ्याची होऊ शकते टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:56 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला दुखापतीचं 'ग्रहण' लागलं आहे. मँचेस्टर कसोटी आधी ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आणखी एका चेहऱ्याची भर पडली आहे. नितीश कुमार रेड्डीही दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयने अद्याप यावर अधिकृत माहिती दिली नसली, तरी बॅकअप खेळाडूच्या रुपात टीम इंडियाच्या ताफ्यात एन्ट्री झालेल्या गड्याला मँचेस्टर कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या नव्या चेहऱ्याची होऊ शकते टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री

अंशुल कंबोज याची टीम इंडियाच्या ताफ्यात एन्ट्री झाली आहे. हरियाणाच्या या खेळाडूला अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर बॅकअप खेळाडूच्या रुपात संघात सामील करण्यात आले आहे. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन कसोटी सामन्याचा हिरो आकाश दीप  लॉर्ड्स कसोटी सामन्यात दुखापतीनं त्रस्त दिसला. कसोटी पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या अर्शदीप सिंगला नेट प्रॅक्टिस दरम्यान हाताला दुखापत झालीये. मँचेस्टर कसोटी आधी नितीश कुमार रेड्डी प्रॅक्टिस वेळी गायब दिसला.

IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन

इंग्लंड दौऱ्यावर लक्षवेधी ठरलेला चेहरा

भारतीय जलदगती गोलंदाज अंशुल कंबोज हा इंग्लंड दौऱ्यावरील भारत 'अ' संघाचा भाग होता. इंग्लंड लायन्स विरुद्धच्या सराव सामन्यात भारत 'अ' संघाकडून त्याने २ सामन्यातील ३ डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय ५१ धावांच्या खेळीसह त्याने बॅटिंगमधील धमकही दाखवली होती. ताफ्यातील दुखापतीमुळे अंशुल कंबोजला टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेण्याचा महा रेकॉर्ड 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंशुल कंबोजनं खास छाप सोडलीये. २४ सामन्यातील ४१ डावात त्याच्या खात्यात ७९ विकेट्स जमा आहेत. यात २ वेळा त्याने पाच विकेट्सचा डाव साधला असून एका डावात अख्खा संघ गारद करण्याचा खास विक्रमही त्याच्या नावे आहे. ६८ धावांत १० विकेट्स ही प्रथम श्रेणीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

शेतकऱ्याच्या पोरावर CSK नं खेळला होता मोठा डाव 

अंशुल हा हरियाणातील कर्नालचा रहिवाशी आहे. ६ डिसेंबर २००० रोजी एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. वयाच्या ६ व्या वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानात मेहनत घेणारा हा क्रिकेटर गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही उपयुक्त कामगिरी करण्यात सक्षम आहे. IPL मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. मेगा लिलावात MS धोनीच्या CSK संघाने या खेळाडूवर ३.४ कोटी एवढी मोठी बोली लावली होती.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडआकाश दीपअर्शदीप सिंग