Ricky Ponting Big Statement On Akash Deep Send Off Ben Duckett : लंडन येथील ओव्हलच्या मैदानातील भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये रंगलेला स्लेजिंगचा खेळही चर्चेचा विषय ठरतोय. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटची विकेट घेतल्यावर आकाशदीपनं केलेली कृतीही लक्षवेधी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आकाशदीप अन् बेन डकेटच्या त्या सीनवर रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया
बेन डकेटला विकेटमागे ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केल्यावर आकाशदीपनं इंग्लंडच्या सलामीवीराला खांद्यावर हात टाकून सेंड ऑफ दिला. यावर आता ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया समोर आलीये. भारतीय गोलंदाजांनं जर ही गोष्ट माझ्यासोबत केली असती तर मी त्याला एक ठोसा मारला असता, असे तो म्हणाला आहे.
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
आकाशदीपच्या 'सेंड-ऑफ'संदर्भातील प्रश्न अन् रिकी पाँटिंगचं उत्तर
स्काय स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात स्पोर्ट्स अँकर इयान वॉर्ड आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यांनी आकाशदीप आणि बेन डकेटचा यांच्यातील मैदानातील गाजत असलेल्या मुद्यावर चर्चा केली. आकाशदीपचा हा अंदाज काही फलंदाजांना अजिबात सहन झाला नसता. बेन डकेटच्या जागी रिकी पाँटिंग असता तर त्याने भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता, असे वाटते, असे इयान वॉर्ड म्हणाला. यावर रिकी पाँटिंगनं हो असं उत्तर दिले.
असं फार कमी वेळा पाहायला मिळतं
दोघांकडे पाहिल्यावर ते एकत्र खेळले असावेत किंवा दोघांच्यात चांगली मैत्री असावी, असे वाटले. फार कमी वेळा असं पाहायला मिळते, असे म्हणत रिकी पाँटिंगनं इंग्लंडच्या सलामीवीराचं कौतुकही केले. बेन डकेटच्या खेळ पाहायला आवडतो. या प्रकरणानंतर या खेळाडू अधिक खास वाटू लागला आहे, असेही पाँटिंगने म्हटले आहे.
आकाशदीपनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला, अन्...
इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेट आणि आकाश दीप यांच्यात एक वेगळा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या बॅटरनं भारतीय गोलंदाजाच्या बॉलिंगवर काही अप्रतिम फटके मारले. १३ व्या षटकात रिव्हर्स स्कूप खेळण्याचा इंग्लंडचा सलामीवीर फसला अन् त्याची विकेट आकाशदीपच्या खात्यात जमा झाली. त्याची विकेट घेतल्यावर आकाशदीप चक्क त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला तंबूचा रस्ता दाखवल्याचे पाहायला मिळाले होते.