IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

बुमराहच्या अनुपस्थितीत DSP सिराजकडे गोलंदाजीचा चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:48 IST2025-08-01T21:43:46+5:302025-08-01T21:48:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Mohammed Siraj Completes 200 Wickets In International Cricket After He Gets Ollie Pope In Oval Test | IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 5th Test, Mohammed Siraj Completes 200 Wickets In International Cricket इंग्लंड आणि भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अखेर मियाँ मॅजिक पाहायला मिळाले. मोहम्मद सिराजने लांबलचक स्पेल टाकत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात ओली पोपची विकेट घेत सिराजनं ओव्हलच्या मैदानात 'द्विशतका'ला गवसणी घातली. एवढ्यावरच न थांबता त्याने जो रुटची मोठी विकेटही आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बुमराहच्या अनुपस्थितीत DSP सिराजकडे गोलंदाजीचा चार्ज

मोहम्मद सिराज भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा २५ वा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीची मदार ही मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती. आपली जबाबदारी चोख पार पाडताना त्याने इंग्लंडच्या महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत अर्धी जबाबदारी पार पाडली आहे. ही जादू कामय राखत तो संघाला विजय मिळवून देत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला बरोबरी साधणारी कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा आहे.

१०१ कसोटी सामने अन् २०० प्लेस विकेट्स

मोहम्मद सिराजनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० पैकी ११५+ विकेट या कसोटीत घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या खात्यात ७१ विकेट्स असून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने १४ फलंदाजांची शिकार केली आहे. मँचेस्टरच्या शंभरावी कसोटी सामना खेळणाऱ्या सिराजनं ओव्हलच्या मैदानात १०१  सामन्यातील १३४ डावात सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्सचा पल्ला गाठला आहे.

सिराजच्या पदार्पणापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्चा डाव साधणारे गोलंदाज

मोहम्मद सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून फक्त ५ भारतीय गोलंदाजांनी २०० चा आकडा पार केला आहे. यात जसप्रीत बुमराह सर्वात आघाडीवर आहे. त्याच्या खात्यात ३६७ विकेट्स जमा आहेत. मोहम्मद शमीने २७७ आणि रवींद्र जडेजाने २७४ विकेट्स घेतल्या असून  कुलदीप यादव (२७३)  आणि आर. अश्विन (२७१) चाही या यादीत समावेश आहे.
 

Web Title: IND vs ENG 5th Test Mohammed Siraj Completes 200 Wickets In International Cricket After He Gets Ollie Pope In Oval Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.