Join us

Virat Kohli, Ind vs Eng Live test Match : चेंडू टाकतानाच कसे रोखता?; विराट कोहलीचा अम्पायरला सवाल, मोहम्मद शमीला थांबवल्याने संतापला, Video 

Ind Vs Eng test Match live : विराट कोहली ( Virat Kohli) कर्णधार नसला तरी त्याच्यातली आक्रमकता तसूभरही कमी झालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:37 IST

Open in App

Ind Vs Eng test Match live : विराट कोहली ( Virat Kohli) कर्णधार नसला तरी त्याच्यातली आक्रमकता तसूभरही कमी झालेली नाही. भारत-इंग्लंड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याच्यात आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याची विकेट गेल्यानंतर विराटने केलेला जल्लोष हा व्हायरल झाला आहे. त्यातच विराटचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात तो थेट अम्पायर्सना सवाल विचारताना दिसतोय...

तोंड बंद ठेव! विराट कोहली भडकला, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसोबत राडा, Video 

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने ६ बाद २०० धावा केल्या आहेत. बेन स्टोक्स २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. विराट आणि अम्पायर यांच्यातला शाब्दिक वाद हा दुसऱ्या दिवसात इंग्लंडच्या डावातील चौथ्या षटकात झाला. अॅलेक्स लीज याची विकेट घेतल्यानंतर हा प्रकार घडला. मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता आणि तो चेंडू टाकण्यासाठी पळत अम्पायरपर्यंत पोहोचला, तोच अम्पायरने हात दाखवून त्याला थांबण्यास सांगितले. इंग्लंडचा फलंदाजही बाजूला झाला, पण, शमीने चेंडू टाकला. 

पावसाचे आगमन झाल्यामुळे तिसऱ्या अम्पायरने मैदानावरील पंचांना खेळ थांबवण्यास सांगितले होते. अम्पायर अलिम दार यांच्या या कृतीवर विराटने नाराजी व्यक्त केली आणि चेंडू टाकतानाच कसे थांबवू शकता, असा सवाल त्याने अम्पायरला केला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीमोहम्मद शामी
Open in App