Join us

IND vs ENG Live 5th Test Match : सोडू की खेळू... या संभ्रमात विराट कोहलीने स्वतःचाच त्रिफळा उडवला, भारताचा डाव गडगडला, Video 

India vs England Test Match Live : पावसाच्या विश्रांतीनंतर भारतीय फलंदाज चांगला खेळ करतील अशी अपेक्षा होती, परंतु मॅथ्यू पॉट्सने धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:16 IST

Open in App

India vs England Test Match Live : पावसाच्या विश्रांतीनंतर भारतीय फलंदाज चांगला खेळ करतील अशी अपेक्षा होती, परंतु मॅथ्यू पॉट्सने धक्के दिले. आधी हनुमा विहारीला LBW केल्यानंतर पॉट्सने विराट कोहलीची ( Virat Kohli) महत्त्वाची विकेट मिळवून दिली.    इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गिल व पुजारा यांनी सकारात्मक सुरूवात केली. गिलने काही सुरेख फटके मारून इंग्लंडच्या ताफ्यात धास्ती निर्माण केली. जेम्स अँडसरसनच्या आऊट स्वींग चेंडूवर गिल १७ धावांवर स्लिपमध्ये झेलबाद झाला.  पुजारा व हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला होता. विहारी सुरूवातीला चाचपडला, परंतु सेट झाल्यानंतर तो चिटकून बसला. जेम्स अँडरसनने भारताला दुसरा धक्का देताना पुजाराला ( १३) स्लिपमध्ये झेलबाद केले. ४६ धावांवर भारताने दोन्ही सलामीवीर गमावले. अँडरसनने कसोटीत सर्वाधिक १२ वेळा पुजाराची विकेट घेतली आहे.

त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि तेव्हा भारताच्या २ बाद ५३ धावा झाल्या होत्या. पावसाच्या व्यत्यायानंतर सुरू झालेल्या डावात विराटने चौकाराने सुरुवात केली. जीवदान मिळाल्यामुले विहारी सावध खेळत होता. पण, २३व्या षटकात मॅथ्यू पॉट्सने भारताला धक्का दिला, विहारी ( २०) पायचीत झाला.  त्यापुढील षटकात पॉट्सने भारताला मोठा धक्का दिला.  २५व्या षटकाच्या दुसरा चेंडू खेळावा की सोडावा या संभ्रामवस्थेत विराट गेला. तो बॅट मागे घेणार त्याआधीच चेंडू बॅटवर आदळून यष्टींवर आदळला... विराट १९ चेंडूंत ११ धावांवर बाद झाला आणि भारताला  ७१ धावांवर चौथा धक्का बसला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली
Open in App