India vs England Test Match Live : ५ बाद ९८ अशा कचाट्यात सापडलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ पंत ( Rishabh Pant) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ही जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १००+ भागीदारी करताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. रिषभने त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी केली. रिषभने ८९ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे पाचवे शतक ठरले, तर इंग्लंडमधील दुसरे... इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाच्या यष्टिरक्षकाने दोन शतक झळकावणारा रिषभ हा पहिला खेळाडू ठरला.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत गिल व पुजारा ही जोडी ओपनिंगला आलेली. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने धक्के दिले. त्याने गिलला १७ धावांवर माघारी पाठवले, त्यानंतर पुजारालाही १३ धावांवर बाद केले. हनुमा विहारी सावध खेळत होता. पण, २३व्या षटकात मॅथ्यू पॉट्सने त्याला ( २०) पायचीत केले. २५व्या षटकाच्या दुसरा चेंडू खेळावा की सोडावा या संभ्रामवस्थेत विराट गेला. तो बॅट मागे घेणार त्याआधीच चेंडू बॅटवर आदळून यष्टींवर आदळला. विराट १९ चेंडूंत ११ धावांवर बाद झाला. अँडरसनने दिवसाची तिसरी विकेट घेताना श्रेयस अय्यरला ( १५) बाद केले. भारताचा निम्मा संघ ९८ धावांवर तंबूत परतला.
![]()
रिषभ पंत व रवींद्र जडेजा या डावखुऱ्या जोडीने खिंड लढवताना ५५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लिच याला रिषभने टार्गेट करताना तुफान फटकेबाजी केली. वयाच्या २४व्या वर्षी भारताकडून १०० षटकार खेचणारा रिषभ पहिला फलंदाज ठरला. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत SENA देशांत कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये रिषभने ( ७) दुसरे स्थान पटकावताना दिलीप वेंगसरकर ( ६) यांचा विक्रम मोडला. तेंडुलकर ( ११) अव्वल स्थानावर आहे. रिषभने कसोटीत २००० धावा पूर्ण करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कसोटीत २००० धावा करणारा रिषभ हा सर्वात युवा यष्टिरक्षक ठरला. जडेजा दुसऱ्या बाजून विकेट सांभाळून होता आणि या दोघांनी ६व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रिषभ अनुभवी गोलंदाज अँडरसनलाही सोडत नव्हता.