Join us

IND vs ENG Live 5th Test Match : विराट कोहलीची बॅटिंग पाहायचीय? पावसाने घेतली विश्रांती, पाहा किती वाजता सुरू होईल मॅच

India vs England Test Match Live : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक २० मिनिटे आधी घेतला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:38 IST

Open in App

India vs England Test Match Live : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक २० मिनिटे आधी घेतला गेला आहे. भारताच्या २ बाद ५३ धावा झाल्या आहेत आणि विराट कोहली व हनुमा विहारी खेळपट्टीवर आहेत. जवळपास तासभर पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे आणि दोनवेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आहे.  शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही नवी सलामीची जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देतानाचे चित्र असतानाच जेम्स अँडरसनने धक्के दिले. पुजारा-हनुमा विहारी या जोडीने बचावात्मक खेळ सुरू ठेवला होता. पण, अँडरसनने सलामीवीर पुजाराचीही विकेट घेतली. 

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गिल व पुजारा यांनी सकारात्मक सुरूवात केली. गिलने काही सुरेख फटके मारून इंग्लंडच्या ताफ्यात धास्ती निर्माण केली. जेम्स अँडसरसनच्या आऊट स्वींग चेंडूवर गिल १७ धावांवर स्लिपमध्ये झेलबाद झाला.  पुजारा व हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला होता. विहारी सुरूवातीला चाचपडला, परंतु सेट झाल्यानंतर तो चिटकून बसला. जेम्स अँडरसनने भारताला दुसरा धक्का देताना पुजाराला ( १३) स्लिपमध्ये झेलबाद केले. ४६ धावांवर भारताने दोन्ही सलामीवीर गमावले. 

अँडरसनने कसोटीत सर्वाधिक १२ वेळा पुजाराची विकेट घेतली आहे.   त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि तेव्हा भारताच्या २ बाद ५३ धावा झाल्या होत्या. विराटने ७ चेंडू खेळल्यानंतर खाते उघडले होते, तर विहारी ४६ चेंडूंत १४ धावांवर खेळतोय. आता सामना सायंकाळी ६.४५ मिनिटांनी सुरू होणार आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीजेम्स अँडरसन
Open in App