Join us  

कुलदीप यादवने धक्का दिला, शुबमन गिलने २० यार्ड पळून भन्नाट झेल घेतला, Video

जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना पहिल्या १४ षटकांत यश मिळत नसल्याचे पाहून रोहित शर्माने फिरकीपटूंना आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 11:07 AM

Open in App

India vs England 5th Test Live update ( Marathi News ) :  जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना पहिल्या १४ षटकांत यश मिळत नसल्याचे पाहून रोहित शर्माने फिरकीपटूंना आणले. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनला पहिल्या षटकात यश मिळाले नसले तरी कुलदीप यादवने कमाल केली. त्याने गुगलीवर बेन डकेटला मोठा फटका मारण्यासाठी भाग पाडले आणि शुबमन गिलने तितक्याच चपळतेने परतीचा झेल घेतला. 

भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सुरू झाली आणि इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रजत पाटीदारला दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागल्याने देवदत्त पड्डिकलला पदार्पणाची कॅप मिळाली. जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाल्याने आकाश दीपला आज आराम करावा लागला. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते आर अश्विनला १००व्या कसोटीची कॅप दिली गेली. यावेळी अश्विनची पत्नी व दोन मुली उपस्थित होत्या. भारतीय खेळाडूंनी अश्विनला Guard of Honour दिला. 

झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी सावध खेळ करताना जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा चांगला सामना केला. २९ धावांवर खेळताना क्रॉलीसाठी भारतीय खेळाडूंनी LBW ची जोरदार अपील केले. मैदानावरील अम्पायरने नाबाद देताना रोहितने DRS घेतला, परंतु त्यात अम्पायर कॉल निकाल आल्याने क्रॉली वाचला. या दोघांनी १४.२ षटकांत फलकावर पन्नास धावा चढवल्या. कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून देताना बेन डकेटला ( २७) माघारी पाठवले. शुबमन गिलने अप्रतिम परतीचा झेल पकडला आणि इंग्लंडला ६४ धावांवर पहिला धक्का बसला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलकुलदीप यादव