IND vs ENG 5th Test, Day 1 Karun Nair Fifty : इंग्लंड दौऱ्यातील मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या करुण नायरनं ओव्हलच्या मैदानात मिळालेल्या संधीच सोनं करत अर्धशतक झळकावले आहे. चेन्नईच्या मैदानातील त्रिशतकी खेळीनंतर कसोटी कारकिर्दीतील त्याची ही दुसऱ्या क्रमांची सर्वोत्तम खेळी आहे. तब्बल ९ वर्षे (जवळपास ३१४६ दिवसांनी) त्याच्या भात्यातून ही खेळी आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
करिअर संपल्यात जमा असल्याचे चित्र, पण आणखी एक संधी मिळाली, अन्...
२०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानात करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतकी खेळी साकारली होती. त्यानंतर काही सामन्यात त्याला टीम इंडियात स्थान मिळाले, पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो संघाबाहेर गेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढल्यावर अखेर ८ वर्षांनी त्याला इंग्लंड दौऱ्यावर पुन्हा एकदा पदार्पणाची संधी मिळाली. पण पहिल्या ३ सामन्यातील ६ डावात तो अर्धशतकी आकडा काही गाठू शकला नाही. लॉर्ड्सच्या मैदानातील ४० धावा ही त्याची या सामन्याआधी सर्वोच्च धावसंख्या होती. मँचेस्टर कसोटीत त्याला बाकावर बसवण्यात आले. त्याचे लॉर्ड्सच्या मैदानातच संपले का? असा प्रश्नही निर्माण झाला होता. पण पाचव्या सामन्यात पुन्हा त्याच्यावर भरवसा दाखवण्यात आला. पाचव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतक झळकावत त्याने अखेर आपल्यातील धमक दाखवली आहे.
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
करुण नायरच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
वीरेंद्र सेहवागनंतर कसोटीत त्रिशतक झळकवणारा करुण नायर हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. चेन्नई कसोटी सामन्यात त्याने ३८१ चेंडूत नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. ओव्हलच्या मैदानात अर्धशतकासह त्याने कारकिर्दीतील दुसरी सर्वोच्च खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी तो ९८ चेंडूचा सामना करून ५२ धावांवर खेळत होता.