IND vs ENG 5th Test, Josh Tongue Take Wicket Of Sai Sudharsan And Ravindra Jadeja : लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शंभरी पार केल्यावर भारतीय संघाने सेट झालेल्या साई सुदर्शन पाठोपाठ ठराविक अंतराने रवींद्र जडेजाच्या रुपात मोठी विकेट गमावली. या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांसमोर जॉश टंग 'उजवा' ठरला. विशेष म्हणजे इंग्लंडच्या ताफ्यातील उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने सैरभैर गोलंदाजी करता करता दोन चेंडू अचूक टप्प्यावर टाकतसंघाला दोन महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. साई आणि जडेजाची त्याने घेतलेली विकेट ही अगदी कॉपी पेस्ट वाटावी, इतकी मिळती जुळती होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'सैरभैर' गोलंदाजीसह केली स्पेलची सुरुवात
जॉश टंग याने आपल्या स्पेलची सुरुवात अगदी 'सैरभैर' अशीच केली. भारताच्या पहिल्या डावातील ९ व्या षटकात कर्णधार ओली पोप याने त्याच्या हाती चेंडू सोपवला. आपल्या पहिल्या षटकात १२ धावा खर्च करताना त्याने तीन चेंडू वाइड टाकले. एवढेच नव्हे तर त्यातील दोन चेंडूवर अवांतर धावांच्या रुपात टीम इंडियाला दोन चौकारही मिळाले. पहिल्या स्पेलमध्ये ५ षटके टाकताना त्याने धावांवर नियंत्रण मिळवले. पण चेंडू अचूक टप्प्यावर टाकण्यात हवे, असणारे नियंत्रण त्याच्या गोलंदाजीत दिसले नाही.
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
आधी साईला दिलं सरप्राइज
भारताच्या डावातील ३६ व्या षटकात जॉश टंग याने आपल्या दुसऱ्या स्पेलची सुरुवातही दिशाहिन चेंडू टाकत केली. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू पकडण्यासाठी विकेट किपर जेमी स्मिथला मोठी कसरत करावी लागली. पण ऑफ स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने साई सुदर्शन याला अचूक टप्प्यावर चेंडू टाकत चकवा दिला. चेंडू बॅटची कड घेऊन जेमी स्मिथच्या हाती गेला अन् १०० हून अधिक चेंडू खेळलेल्या युवा भारतीय बॅटरचा खेळ ३८ धावांवर खल्लास झाला.
जड्डू कडून होती मोठी आस, पण जॉशनं त्यालाही चेंडू टाकला एकदम खास
त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जड्डूलाही त्याने आपल्या जाळ्यात अडकवले. दुसऱ्या स्पेलमधील आपल्या आठव्या षटकात जॉश टंगनं जड्डूची विकेट घेतली. त्याआधी पहिल्या चेंडूवर लेग स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर भारतीय संघाला चार धावा मिळाल्या. या षटकात जड्डूनं एक अप्पर कट चौकारही लगावला. पण तिसऱ्या चेंडूवर तो फसला. साईला जो चेंडू टाकला होता त्याच पॅटर्नमध्ये जॉशनं मँचेस्टरमधील शतकवीराला अवघ्या ९ धावांवर तंबचा रस्ता दाखवला.
Web Title: IND vs ENG 5th Test Josh Tongue Take Wicket Of Sai Sudharsan And Ravindra Jadeja Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.