Joe Root Became First Batter Ever 6000 Runs In WTC : मॉडर्न जमान्यातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या जो रुटनं भारतीय संघाविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यात आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीये. अर्धशतकी खेळीसह टीम इंडियाचे टेन्शन वाढवणाऱ्या जो रुटनं दुसऱ्या डावात २५ धावा करताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. WTC स्पर्धेत हा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील नंबर वन बॅटर
कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित करणारा जो रुट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यात आधीपासून अव्वलस्थानी आहे. ६ हजार धावांचा पल्ला गाठत त्याने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. या यादीत फॅब फोरमधील ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ ४२७८ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याने ५५ कसोटीत या धावा केल्या आहेत.
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
कसोटीत सर्वाधिक धावा! सचिन तेंडुलकर पाठोपाठ तो दुसऱ्या स्थानी
जो रूट याने २०१२ मध्ये नागपूरच्या मैदानात भारतीय संघाविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीला तो फारसा प्रभाव टाकू शकला नाही. पण २०२० पासून तो सातत्याने सर्वोत्तम फलंदाजी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियातील मैदानात शतकी दुष्काळ सोडला तर प्रत्येक मैदानात त्याने आपली छाप सोडली आहे. १५८ कसोटी सामन्यात रुटच्या खात्यात १३४५९ हून अधिक धावांची नोंद आहे. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फक्त सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे.
जो रुट- हॅरी ब्रूक जोडी जमली, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
ओव्हलच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघासमोर ३७४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्यावर जो रूटनं संयमी खेळी करत कसोटीत आणखी एका अर्धशतकाला गवसणी घातली. हॅरी ब्रूकच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी १५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत त्याने ओव्हल कसोटीत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे.
Web Title: IND vs ENG 5th Test Joe Root Became The First Batter Ever 6000 Runs In World Test Championship See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.