Join us

क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

सिराजमुळेच अडचणीत आली होती टीम इंडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:49 IST

Open in App

IND vs ENG, Mohammed Siraj On Chris Woakes : ओव्हलच्या मैदानात रंगतदार झालेल्या सामन्यात टीम इंडियानं यजमान इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला. मोहम्मद सिराजनं टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अल्प धावसंख्येत इंग्लंडच्या संघाला धक्क्यावर धक्के बसल्यावर क्रिस वोक्स  खांद्याला फॅक्चर असताना मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

हात गळ्यात अडकवून क्रिस वोक्स मैदानात उतरला, अन्..

क्रिस वोक्सनं एक हात गळ्यात अडकवून संघासाठी मैदानात उतरत लढवय्या वृत्ती दाखवली. त्याची ही गोष्ट फक्त इंग्लंडच्याच नव्हे तर भारतीय क्रिकट चाहत्यांच्याही मनाला भावली. क्रिस वोक्स मैदानात उतरल्यावर तो बॅटिंग कशी करणार? हा मोठा प्रश्नच निर्माण झाला होता. पण गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) आपल्या सहकाऱ्याला स्ट्राइकवरुन दूर ठेवत फक्त त्याची साथ धावा काढण्यासाठी हवी ही भूमिका घेतली. सिराजनं गसॲटकिन्सनची विकेट घेतली अन् भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा डाव साधला. दुसऱ्या बाजूला क्रिस वोक्स हा एकही चेंडू न खेळता नाबाद परतला.

तो स्ट्राइकवर आला असता तर...? क्रिस वोक्ससंदर्भात सिराजनं असं दिलं उत्तर

ओव्हलच्या मैदानातील हिरोगिरीनंतर मोहम्मद सिराज कर्णधार शुबमन गिलसोबत पत्रकारपरिषदेत सहभागी झाला. यावेळी त्याने अनेक प्रश्न विचारण्यात आले. एक हात गळ्यात अडकवून मैदानात उतरलेला क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता, तर त्याला कशी गोलंदाजी करण्याचा प्लॅन होता? असा प्रश्न  सिराजला विचारण्यात आला होता. यावर सिराजनं सर्वात आधी क्रिस वोक्सच्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं. मग तो म्हणाला की, जर तो स्ट्राइकवर आला असता तर मी स्टंप लाइनवरच गोलंदाजी केली असती.

सिराजमुळेच अडचणीत आली होती टीम इंडिया

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत चौथ्या दिवशीच सामना जिंकेल, असे वाटत होते. पण मोहम्मद सिराजनं १९ धावांवर हॅरी ब्रूकचा कॅच सोडला. त्याने आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकल अन् टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. दुसऱ्या बाजूला जो रुटनंही शतक केलं. पण शेवटच्या दिवशी सिराजनं तीन विकेट घेत चौथ्या दिवसाची चूक भरून काढत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराज