Join us

IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)

पहिल्या डावात त्याने बॅटिंग केली नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:26 IST

Open in App

IND vs ENG, 5th Test  Standing ovation for Chris Woakes : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात खांदा फॅक्चर असताना क्रिस वोक्स बॅटिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. तो मैदानात उतरत असताना प्रेक्षकांनी उभे राहून त्याच्या या लढवय्या वृत्तीला सलाम केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या पहिल्या डावात करूण नायरने मारलेला फटका रोखताना तो सीमारेषेवर दुखापतग्रस्त झाला होता.  

इंग्लंडचा पहिला डाव ९ विकेट्स पडल्यावरच 'खल्लास'

क्रिस वोक्स हा इंग्लंडच्या ताफ्यातील महत्त्वाचा गोलंदाज तर आहेच. पण गरज पडल्यास फलंदाजीत उपयुक्त खेळी करण्यातही तो माहिर आहे. एक धाव वाचवण्याच्या नादात तो जायबंदी झाला. पहिल्या डावात १४ षटकांची गोलंदाजी करून तो आउट झाला. गोलंदाजीत त्याची कमी जाणवलीच. पण पहिल्या डावात तो बॅटिंग न करू शकल्यामुळे इंग्लंडचा डाव हा ९ विकेट्स पडल्यावरच खल्लास झाला.  

ओव्हलच्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी ३७४ धावांचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रुट दोघांनी शतके झळकावून इंग्लंडचा पेपर सोपा केला होता. पण ही दोघे तंबूत परतल्यावर इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये तारांबळ उडाली. चौथ्या दिवसाच्या खेळात एकापाठोपाठ एक धक्के बसल्यावर खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स इंग्लंडची मॅच जर्सी घालून तयार झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पाचव्या दिवशी जर विकेट्स पडल्या तर तो मैदानात उतरणार याचे संकेत मिळाले होते. झालेही तसेच. सिराजनं पाचव्या दिवसाच्या खेळात दोन षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडला अडचणीत आणले प्रसिद्ध कृष्णानं जॉश टंगचा त्रिफळा अडवला अन् एक हात बांधून क्रिस वोक्स मैदानात उतरला.  

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंड