Join us

IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी

"हारी बाजी को जिताना हमे आता है...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:34 IST

Open in App

IND vs ENG 5th Test India Won By 6 Runs Mohammed Siraj : ओव्हलच्या मैदानातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकत इतिहास रचला आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. ४ विकेट्स हाती असल्यामुळे सामना इंग्लंडच्या हातात होता. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सर्व ताकदपणाला लावत "हारी बाजी को जिताना हमे आता है...." या तोऱ्यात जबरदस्त कमबॅक करून ओव्हलचं मैदान मारलं. सामान जिंकण्यासाठी आवशक्य असलेल्या ४ पैकी ३ विकेट्स सिराजनं घेतल्या. प्रसिद्ध कृष्णानं त्याला एक विकेट घेत उत्तम साथ दिली. भारतीय संघाने ६ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाने सेट केलं होतं ३७४ धावांचे टार्गेट

भारतीय संघाने पहिल्या डावात २२४ धावा केल्यावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात २४७ धावा केल्या होत्या. इंग्लंडची अल्प आघाडी भेदून टीम इंडियाने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडसमोर ३७४ धावांचा टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर बेन डकेटच्या अर्धशतकानंतर हॅरी ब्रूक १११ (९८ आणि जो रूट १०५ (१५२) यांनी शतकी खेळी केली. या दोघांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. पण चौथ्या दिवसाच्या खेळात आकाश दीपनं हॅरी ब्रूक अन् प्रसिद्ध कृष्णानं जो रुटची विकेट घेतल्यावर सामन्यात ट्विस्ट निर्माण झाले.

IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)

 ३५ धावा अन् ४ विकेट्स अस समीकरण! सिराजचा जलवा अन् टीम इंडियाने ६ धावांनी जिंकला सामना

पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर आपल्या पहिल्याच षटकात सिराजनं जेमी स्मिथच्या रुपात पहिली विकेट घेतली. दुसऱ्या चेंडूवरही त्याने विकेटचा डाव साधला होता. पण केएल राहुलकडून स्लिपमध्ये कॅचची संधी हुकली. मग सिराजनं दुसऱ्या षटकात ओव्हरटनला तंबूत धाडले. प्रसिद्ध कृष्णानं जॉश टंगला बोल्ड केल्यावर मोडक्या खांद्यानं क्रिस वोक्स मैदानात उतरला. त्याचा निर्णय कौतुकास्पद अन् क्रिकेट इतिहासातील एक खास क्षणच होता. गस ॲटकिन्सन त्याला स्ट्राइक न देता मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण सिराजनं त्याची विकेट घेतली अन् इंग्लंडचा डाव ३६७ धावांत आटोपला.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५