Mohammed Siraj vs Ollie Pope : ओव्हलच्या मैदानातील इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजनं आपल्या खांद्यावर पडलेली जबाबदारी चोख बजावली. पहिल्या डावात चार विकेट्सचा डाव साधल्यावर दुसऱ्या डावात त्याने पुन्हा एकदा त्याने आपल्या भेदक गोलंदाजीनं इंग्लंडच्या फलंदाजांना चारीमुंड्या चित केले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस झॅक क्रॉउलीच्या रुपात त्यानेच संघाला पहिले यश मिळवून दिले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्णधार ओली पोपच्या विकेट्ससह सिराजन साधला सर्वाधिक विकेट्सचा डाव
चौथ्या दिवसाच्या खेळात लांबलचक स्पेल टाकताना सिराजनं कर्णधार ओली पॉपच्या रुपात इंग्लंडच्या संघाला तिसरा धक्का दिला. या विकेटसह सिराज अँडरसन-तेंडुलक ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. इंग्लंड कर्णधाराच्या रुपात त्याने या मालिकेतील २० वी विकेट आपल्या खात्यात जमा केली.
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
आरे..हा इनस्विंग होता की, ऑफस्पिन?
इंग्लंडच्या डावातील २७ व्या षटकात मोहम्मद सिराजनं परफेक्ट सेटअसह ओली पोपला आपल्या जाळ्यात अडकवले. आधी ऑफ स्टंप बाहेर चेंडू काढत त्याने बेन स्टोक्ससाठी सापळा रचला. मग एक चेंडू परफेक्ट टप्प्यावर टाकत आत आलणा. या षटकातील सिराजनं टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर अक्षरश: हातभर वळला अन् काही कळायच्या आत ओली पोपच्या पॅडवर जाऊन आदळला. अपीलवर पंचांनी पायचित दिल्यावर ओली पोपनं रिव्ह्यू घेतला. पण विकेटसह इंग्लंडने रिव्ह्यूवही गमावला. जलदगती गोलंदाजाने आत आणलेला चेंडूला इनस्विंग म्हणतात. पण सिराजचा जबरदस्त स्विंग पाहिल्यावर हा चेंडू इनस्विंग होता की, ऑफ स्पिन असा प्रश्न पडू शकतो, एवढा भारी होता.
Web Title: IND vs ENG 5th Test Day 4 Mohammed Siraj Sent Back England Skipper Ollie Pope For 27 Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.