Join us

Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

जाणून घ्या शतकानंतर जो रुटनं असं करण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 21:53 IST

Open in App

Joe Root Dons The Headband In Tribute Graham Thorpe : ओव्हलच्या मैदानात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जो रुटनं टीम इंडियाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. चौथ्या दिवसाच्या खेळातील तिसऱ्या सत्रात इंग्लिश बॅटरनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३९ व्या शतकाला गवसणी घातली. भारतीय संघाविरुद्ध त्याच्या भात्यातून आलेले हे १३ शतक ठरले. या खेळीसह त्याने आणखी काही विक्रम मोडीत काढलेच. पण शतकी खेळीनंतर त्याने जे कृत्य केले ते लक्षवेधी ठरले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ६९ व्या षटाकात आकाशदीपच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत रुटनं १३७ चेंडूत शतक साजरे केले. त्यानंतर हेल्मेट काढून त्याने आपल्याकडील व्हाइट हेडबँड काढला अन् डोक्याला बांधला. त्याची ही कृती लक्षवेधी ठरली. रुटनं ही शतकी खेळी १०० हून अधिक कसोटी सामने खेळणारे इंग्लंडचे दिग्गज आणि दिवंगत क्रिकेटपटू ग्राहम थॉर्प यांना समर्पित केली. 

IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!

दिग्गज क्रिकेटरच्या स्मरणार्थ खास उपक्रम

ओव्हलच्या मैदानातील दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे माजी क्रिकेटर ग्राहम थॉर्प यांच्या सन्मानार्थ इंग्लंडच्या संघातील खेळाडूंसह चाहत्यांनी दिग्गजाच्या ५६ व्या बर्थडेच्या दिवशी खास उपक्रम राबवला होता. गतवर्षी ५५ वा वाढदिवस साजरा केल्यावर  या क्रिकेटरनं दिर्घकालीन नैराश्यातून आत्महत्या केली होती. हा क्रिकेटर हेडबँड बांधून क्रिकेटच्या मैदानात उतरायचा. त्यांच्या कुटुंबियांकडून क्रिकेट नावाच्या लोगाच्या हेडबँडच्या विक्रीसह निधी गोळा करण्यात येत असून मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी हा निधी देण्यात येणार आहे.

शतकी खेळीसह रुटनं केली गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी

टीम इंडियाविरुद्धच्या १३ षटकासह जो रुट एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गावसकरांच्या सोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.  गावसकरांनी वेस्ट इंडिज विरुद्ध १३ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत डॉन ब्रॅडमन १९ शतकासह या यादीत अव्वलस्थानी आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुट ३९ शतकासह  चौथ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर ५१ शतकासह सर्वात आघाडीवर असून दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (४५) आणि रिकी पाँटिंग (४१) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट