Join us

VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...

आधी लॉर्ड्सच्या मैदानात अन् आता इथंही सिराज ठरला कमनशिबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:46 IST

Open in App

Mohammed Siraj Harry Brook : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भारतीय संघाने दिलेल्या ३७४ धावांचा पाठलाग करताना सिराज अन् प्रसिद्ध कृष्णानं इंग्लंडच्या संघाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात तंबूत पाठवले. लंच आधी टीम इंडियाला ब्रूकच्या रुपात चौथं यशही मिळालेच होते. पण सीमारेषेवर सिराजनं कॅच घेतल्यावर अंदाज चुकला अन् ब्रूकला सिक्सरसह जीवनदान मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रसिद्ध कृष्णानं विकेटचा आनंदही साजरा केलेला, पण... 

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ३५ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने इंग्लंडचा चौथा धक्का दिलाच होता. आखूड टप्प्याच्या चेंडूवर हॅरी ब्रूकनं मोठा फटका खेळला. सीमारेषेवर मोहम्मद सिराजनं झेल घेतला. प्रसिद्ध कृष्णानं या विकेटचं सेलिब्रेशनही केलं. तिकडं सिराजा अंदाज चुकला अन् तो झेल टिपल्यावर चेंडू घेऊन सीमारेषेबाहेर गेला. 

VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम

सिराजसह टीम इंडियातील खेळाडू अन् भारतीय चाहतेही झाले आवाक्

 

कॅच घेतल्यावर सिराजचा पाय आधी सीमारेषेला लागला. त्यानंतर तो पूर्णत: बाहेर गेला. जे घडलं त्यावर सिराजला विश्वासच बसेना. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. ड्रेसिंग रुममध्ये कोच गौतम गंभीरचा अन् मैदानात टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलसह अन्य खेळाडूंचा चेहराही पडला. ब्रूक हा जलदगतीने धावा करून सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. त्याची ही विकेट टीम इंडियाला महागात पडू शकते. 

लंच आधी जीवनदान मिळालं, मग ब्रूकनं ठोकली फिफ्टी

सिराजनं सीमारेषेवर हातात आलेली संधी गमावली त्यावेळी हॅरी ब्रूक २१ चेंडूत अवघ्या १९ धावांवर खेळत होता. लंच आधी जीवनदान मिळाल्यावर त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. लंचनंतर पुन्हा फलंदाजीला आल्यावर त्याने अर्धशतकही पूर्ण केले.

आधी लॉर्ड्सच्या मैदानात अन् आता इथंही सिराज ठरला कमनशिबी

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. जड्डू आणि बुमराहनं कमालीची फलंदाजी करत सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला. बुमराहची विकेट पडल्यावर जड्डू आणि सिराज जोडी जमली.  सगळं काही सुरळीत चाललंय असं वाटत असताना सिराज दुर्देवीरित्या आउट झाला होता. शोएब बशीरच्या षटकातील चेंडू उत्तमरित्या खेळून काढल्यावर चेंडू बॅकस्विंग होत स्टंपवर आदळला अन् सिराजच्या विकेटसह टीम इंडियाने सामना गमावला. लॉर्ड्सच्या मैदानातील सिराजची विकेट दुर्दवी अशीच होती. याची चर्चा ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत चर्चेचा विषय ठरली. आता ओव्हल कसोटी सामन्यात सीमारेषेवर उत्तम कॅच घेतल्यावर सिराज कमनशिबी ठरलाय. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराज