IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!

लंच आधी त्याने विकेट फेकलीच होती, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 20:32 IST2025-08-03T20:22:29+5:302025-08-03T20:32:58+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Day 4 Harry Brook Brings Up His Tenth Test Century After Mohammed Siraj takes the catch but then stumbles over the boundary At The Oval | IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!

IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 5th Test Day 4 Harry Brook Century : ओव्हलच्या मैदानात इंग्लंडचा स्टार बॅटर हॅरी ब्रूक याने २१ धावांवर मिळालेल्या संधीचं सोनं करताना कसोटी वे शतक ठोकले आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ३५ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर तो फसला होता. पण  कॅच घेतल्यावर सिराज सीमारेषेबाहेर गेला अन् हॅरी ब्रूकला सिक्सरसह एक जीवनदान मिळालं. त्यानंतर आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना ५० व्या डावात हॅरी ब्रूकनं कसोटी कारकिर्दीतील दहाव्या शतकाला गवसणी घातली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जो रुटसोबत तगडी भागीदारी करत ब्रूकनं टीम इंडियाला ढकलले बॅकफूटवर 

भारतीय संघाने दिलेल्या ३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात तंबूत धाडण्यात टीम इंडियाला यश मिळालं. लंच आधी  हॅरी ब्रूकच्या रुपात चौथ्या विकेट्सची संधीही चालून आली. पण टीम इंडियाने ही संधी गमावली. त्यानंतर हॅरी ब्रूक याने जो रुटसोबतच्या तगडी भागीदारी रचत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. 

IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज

सिराजच्या हातीच झेल देत संपली इनिंग, पण...

भारतीय संघाने सेट केलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक हाच मोठा धोका होता. कारण तो आक्रमक अंदाजात खेळून जलद धावा करण्यावर भर देतो. एक जीवनदान मिळाल्यावर त्याने पुन्हा भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही. जो रुटसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची  भागीदारी केली. शतक झळकावल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात आकाशदीपच्या गोलंदाजीवर फटका मारल्यावर त्याच्या हातून बॅट निसटली. हवेत उंच उडालेला चेंडू सिराजच्या हातीच विसावला. ज्याने कॅच सोडला त्यानेच त्याच्या इनिंगला ब्रेक लावला. पण तोपर्यंत हॅरी ब्रूकनं शतक पूर्ण करत संघाला विजयाच्या अगदी समीत नेऊन ठेवले होते.


 

Web Title: IND vs ENG 5th Test Day 4 Harry Brook Brings Up His Tenth Test Century After Mohammed Siraj takes the catch but then stumbles over the boundary At The Oval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.