IND vs ENG 5th Test Day 3, Yashasvi Scored Sixth Century Test Career : शतकी खेळीसह इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करणाऱ्या यशस्वी जैस्वालनं ओव्हलच्या मैदानातील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातही शतकाला गवसणी घातली आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या भात्यातून निघालेले हे दुसरे आणि कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. यातील चार शतके त्याने इंग्लंडविरुद्धच झळकावली आहेत. २४ वर्षीय या फलंदाजाने भारतीय संघाच्या डावातील ५१ व्या षटकात शतकाला गवसणी घातली. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने या सामन्यात २०० पार धावसंख्येची आघाडी घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!२०२३ नंतर टेस्टमधील बेस्ट ओपनर; शतकी 'सिक्सर'सह साधला हा डाव
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील हेडिंग्लेच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जैस्वाल याच्या भात्यातून शतक आले. पण चांगली सुरुवात केल्यावर त्याच्या कामगिरीत चढ उतारही पाहायला मिळाला. दोन डावात तर त्याच्या पदरी भोपळाही पडला. पण अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने सहावे शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावे केला आहे. २०२३ नंतर सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक शतके झळकवण्याचाविक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. या यादीत इंग्लंडचा बेन डकेट ५ शतकासह दुसऱ्या स्थानावर असून उस्मान ख्वाजा आणि रोहित शर्मा प्रत्येकी ४ शतकासह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत.
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
इंग्लंडविरुद्ध गावसकर अन् रोहित शर्मापेक्षा जलदगतीने मारला शतकी 'चौकार'
ओव्हलच्या मैदानात १२७ चेंडूत शतक साजरे करताच यशस्वी जैस्वाल याने खास विक्रमालाही गवसणी घातली. सलामीवीराच्या रुपात गावसकरांपेक्षाही जलदगतीने त्याने इंग्लंडविरुद्ध चौथे शतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे. १० व्या कसोटी सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध चौथे शतक झळकावले आहे. गावसकरांनी इंग्लंडविरुद्ध चार शतके झळकवताना ३७ सामने खेळले होते. रोहित शर्माने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना १३ कसोटी सामन्यात ४ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.